
मुंबई /प्रतिनिधि
संपूर्ण जगासमोर आपला आदर्श निर्माण करणारे त्यासोबतच भारतीय आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणे हातभार लावणारे प्रसिद्ध उद्योगपती तसेच टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांनी मुंबईतील ब्रिच कॅन्डी रुग्णालयात ११:३० अखेरचा श्वास घेतला. व त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी आपला जीवन प्रवास इथे संपवला. रविवारी मध्यरात्री त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या जाण्याने उद्योगजगतातील वटवृक्ष हरपल्याच्या प्रतिक्रिया उद्योजक तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातून उमटल्या आहेत. सर्वसामान्य कुटुंबीयांचे कारचे स्वप्न पूर्ण करून नॅनोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले टाटा यांच्या जाण्याने उद्योगविश्वातील एक ऋषितुल्य व्यक्तीची न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या शालीन आणि सुसंस्कृत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगविश्वासह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.रतन टाटा यांना सोमवारी पहाटे प्रकृती अस्वास्थ्यामुळे ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. बुधवारी उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटीलेटवर ठेवण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूकडून सर्व शर्तीचे प्रयत्न सुरु होते मात्र रात्री उशिरा त्यांचे दीर्घ आजराने निधन झाले. रात्री उशिरा टाटा सन्स चे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी ही बातमी अधिकृतरित्या जाहीर केली.
जाणून घेऊया रतन टाटा (Ratan Tata) बद्दल
सन्मान आणि पुरस्कार
🔵 रतन टाटा यांना भारतीय सरकारने 2000 साली “पद्मभूषण” या सन्मानाने सन्मानित केले. आणि 2008 साली भारत सरकारने “पद्मविभूषण” या सन्मानाने सन्मानित केले.
🔵 रतन टाटा यांना महाराष्ट्र सरकारने त्यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्यासाठी 2006 साली “महाराष्ट्र भूषण” या सन्मानाने सन्मानित केले
रतन टाटा यांनी केली सर्वसामान्यांसाठी नॅनो कारची निर्मिती.
चालवणाऱ्या सर्वसामान्य जनतेचे चार चाकी चे स्वप्न साकार व्हावे व सर्वसामान्यांना सुद्धा त्यामधून प्रवास करता यावा यासाठी रतन टाटा यांनी सर्वसामान्यांसाठी अवघ्या एक लाखांमध्ये ग्राहकांना खरेदी करता यावी अशा नॅनोकारक ची निर्मिती केली होती. 2022 मध्ये त्यांच्या इंस्टाग्राम पोस्ट मध्ये लिहिले होते की “भारतीय कुटुंब स्कूटरवर जाताना नेहमी बघत आलोय. आई बाबा आणि त्यांच्यामध्ये मुलं अशी ती सवारी असायची अशा स्कूटर मधूनच मला नॅनो कार च कल्पना आली आणि अशी जी गाडी असेल की जी सर्वसामान्य कुटुंबाला परवडणारी असेल.