जळगाव जामोद/बुलढाणा प्रतिनिधी
बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील जळगाव जामोद या शहरांमध्ये खाजगी शिकवणी वर्ग घेणाऱ्या शिक्षकाने एका १७ वर्षीय मुलीचा काही “प्रॉब्लेम” आहे का.? असं म्हणत केला विनयभंग केल्याची घटना जळगाव जामोद या शहरांमध्ये घडली आहे. याप्रकरणी आरोपी शिक्षकास जळगाव जामोद पोलिसांनी अटक केली आहे.सविस्तर वृत्त असे की बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद या शहरांमध्ये जळगाव जामोद (jalgaon jamod) या तालुक्यातील पीडित मुलगी अकरावीला शिक्षण घेत आहे.
व त्याचबरोबर तिने एका अकॅडमी मध्ये खाजगी शिकवणी वर्ग सुद्धा लावला होता. तेव्हा 26 सप्टेंबर च्या सकाळी नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान आरोपी शिक्षक किशोर पाटील याने पीडित मुलगी तिच्या अंगावरून वाईट उद्देशाने हात फिरवत विचारले की काही प्रॉब्लेम आहे का..? अशी तक्रार पीडित मुलीने जळगाव जामोद पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे त्यानुसार आरोपी शिक्षक किशोर पाटील यांच्या विरुद्ध कलम ७४, सहकलम ८ उसको अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.