
samruddhi mahamarg accident : इंजिन गरम झाल्यामुळे कारने पेट घेतल्याची घटना ११ सप्टेंबर रोजी घडली. कारचालकाच्या लक्षात आल्याने तिघेजण बचावले. अमरावती amravati येथून जयंत विठ्ठलराव बंदिवान, पूर्वी रितेश जयस्वाल, रोहित राजेंद्र सरिया (रा. अमरावती) हे कार क्रमांक (एमएच ०४ एचयू १०७६) ने मुंबईकडे जात होते. दरम्यान, समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ३११ मुंबई कॉरिडॉरवर इंजिन गरम झाल्याने कारने पेट घेतला.
ही बाब चालकाच्या निदर्शनास येताच त्याने समयसूचकता ठेवत सर्वांना सुरक्षित खाली उतरवले. आग लागल्याचे कळताच कारचालकाने ‘समृद्धी कंट्रोल रूमला’ माहिती दिली. त्यानंतर तत्काल महामार्ग पोलिसचे पोलिस उपनिरीक्षक गजानन उज्जैनकर, पो.हे. कॉ. उदय गीते, विजय आंधळे व महाराष्ट्र सुरक्षा बलचे अमोल जाधव, सचिन सणांनसे यांनी घटनास्थळावर धाव घेऊन वाहतूक काही वेळ थांबवली होती.क्यूआरव्ही टीमने पाणी टाकून आगीवर नियंत्रण मिळवले. पण तोपर्यंत संपूर्ण कार जळून खाक झाली. यामध्ये कारमधील प्रवाशाचे बॅगमध्ये भरलेले सामान, महत्त्वाचे डॉक्युमेंट व इतर घरगती साहित्य जळून खाक झाले.