KattaNews नवीन जाहिरात KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजात बालाजी मंदिरात महाआरती; शिवसैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग!

On: November 26, 2026 9:11 AM
Follow Us:
देऊळगाव राजा येथील बालाजी मंदिरात प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडून महाआरती

देऊळगाव राजा | मनोहर खंदारे

KattaNews जाहिरात 1

केंद्रीय राज्यमंत्री तथा आयुष मंत्रालयाचे (स्वतंत्र प्रभार) मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजा येथे शिवसैनिकांच्या वतीने उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री बालाजी महाराज मंदिरात महाआरती करून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

KattaNews जाहिरात 2

मंगळवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी झालेल्या या महाआरतीच्या कार्यक्रमामुळे बालाजी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित शिवसैनिकांनी श्री बालाजी महाराजांची विधिवत पूजा-अर्चा करून सामूहिक महाआरती केली. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावे, तसेच त्यांच्या हातून देशाची आणि जनतेची सेवा यापुढेही घडत राहावी, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

KattaNews जाहिरात 3

प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमात शिवसैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. महाआरतीनंतर उपस्थितांनी एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. देऊळगाव राजा शहरात धार्मिक वातावरणात हा वाढदिवस साजरा करण्यात आला.

KattaNews जाहिरात 4

या कार्यक्रमाला सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, शिवसेना शहरप्रमुख गोपालजी व्यास, उपजिल्हाप्रमुख दिनकर खरात, जगदीश कापसे, सचिन व्यास, अमोल काकड, दीपक पवार, अतिश खराट, अभय दीडहाते, रवी खरात, मुन्ना तिडके, राजेश सपाटे, बद्री कोल्हे, गजानन शेळके, संदीप तळेकर, विनोद कोल्हे, शेख अनिस, शेख जावेद यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.


📲 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा!

देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट मिळवण्यासाठी Katta News च्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

✅ Join WhatsApp Group


आपल्या परिसरातील बातमी, जाहिरात किंवा स्थानिक घडामोडी आमच्यापर्यंत पोहोचवा. Katta News शी संपर्क साधा आणि आपल्या भागाचा आवाज अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवा.

बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि स्थानिक घडामोडींसाठी आत्ताच भेट द्या 👉 https://kattanews.in/

Katta News – बातमी आपल्या गावाची, आवाज आपल्या माणसांचा!


📰 संबंधित बातम्या

मनोहर खंदारे

मनोहर खंदारे हे कट्टा न्यूजचे प्रतिनिधी असून महाराष्ट्रातील स्थानिक, सामाजिक, राजकीय आणि ग्रामीण भागातील ताज्या घडामोडींवर बातम्या देतात. स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या समस्या आणि महत्त्वाच्या घटनांची अचूक व विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे ते काम करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मेहकर तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग आणि रेशन कार्ड प्रकरण

मेहकर तहसीलच्या पुरवठा विभागात दलालांचा सुळसुळाट! रेशन कार्डच्या नावाखाली नागरिकांची लूट; CCTV तपासण्याची मागणी

देऊळगाव राजा पोलीस ठाणे आणि १४ लाखांच्या सायबर फसवणुकीची बातमी

पुलवामा प्रकरणाचा बनाव, पोलीस असल्याची बतावणी अन् अटकेची धमकी; देऊळगाव राजातील निवृत्त बँक व्यवस्थापकाला १४ लाखांचा गंडा!

देऊळगाव राजा येथे दुचाकीच्या डिक्कीतून १.८० लाख रुपयांची रोकड चोरी

देऊळगाव राजा शहरात भरदिवसा चोरी; आधार अपडेट करण्यासाठी दुकानात गेले अन् दुचाकीच्या डिक्कीतून १.८० लाख लंपास!

डोणगाव ग्रामपंचायतीचा पदभार स्वीकारण्यास गजानन मवाळ यांचा नकार

दुसऱ्या ग्रामपंचायतीचा पदभारही नाही, तरी डोणगावचा पदभार घेण्यास नकार; गजानन मवाळ यांच्या भूमिकेने प्रशासकीय पेच!

खडकपूर्णा प्रकल्पातील शेतीच्या मोटारी बंद करण्याच्या प्रयत्नाला विरोध करणारे शेतकरी

आधी अवैध रेती उपसा बंद करा, मगच मोटारी बंद करा! खडकपूर्णा प्रकल्पावर शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना इशारा

अमडापूर शिवारात गोठ्यात सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग निदान प्रकरणात तीन जिल्ह्यांच्या पीसीपीएनडीटी पथकाची संयुक्त कारवाई

अमडापुरात गोठ्यात सुरू होता अवैध गर्भलिंग निदानाचा प्रकार! तीन जिल्ह्यांच्या पथकाची संयुक्त कारवाई; पिता-पुत्रासह तिघांना अटक

Leave a comment