KattaNews नवीन जाहिरात KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

साखरखेर्डा परिसरात महिनाभरापासून मोबाईल नेटवर्क गायब! जिओसह अनेक कंपन्यांच्या सेवेने ग्राहक त्रस्त

On: November 21, 2026 7:11 AM
Follow Us:
साखरखेर्डा परिसरात मोबाईल नेटवर्क नसल्याने नागरिक त्रस्त

साखरखेर्डा  | समाधान सरकटे 

KattaNews जाहिरात 1

साखरखेर्डा आणि परिसरातील अनेक गावांमध्ये गेल्या महिनाभरापासून मोबाईल नेटवर्कची समस्या गंभीर बनली आहे. जिओ आणि व्होडाफोन-आयडिया (Vi) यांसह मोबाईल कंपन्यांची सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने नागरिकांना संवाद साधतानाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकदा नेटवर्क पूर्णपणे गायब होत असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी वाढत असून, वारंवार तक्रारी करूनही समस्येचे निराकरण होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

KattaNews जाहिरात 2

साखरखेर्डा, लव्हाळा, सवडद, मोहाडी, राताळी, शिंदी, गुंज, वरोडी, गोरेगाव, उमनगाव, पांगरी काटे, बाळसमुद्र, सायाळा, लिंगा, शेंदुर्जन, आंबेवाडी, झोटींगा, देऊळगाव कोळ आणि मलकापूर पांग्रा यांसह परिसरातील अनेक गावांमध्ये मोबाईल नेटवर्कची समस्या जाणवत आहे. दिवसातून एखाद-दोन वेळा नेटवर्क उपलब्ध झाले तरी काही वेळातच पुन्हा सेवा खंडित होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

KattaNews जाहिरात 3

मोबाईल हा आजच्या काळात केवळ संवादाचे साधन राहिलेला नाही, तर दैनंदिन व्यवहारांचा महत्त्वाचा भाग बनला आहे. ऑनलाइन पेमेंट, बँकिंग व्यवहार, व्यावसायिक संपर्क, शासकीय कामे आणि विविध ऑनलाइन सेवांसाठी मोबाईल नेटवर्क आवश्यक असते. मात्र, नेटवर्क उपलब्ध नसल्याने या कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.

KattaNews जाहिरात 4

या समस्येचा सर्वाधिक त्रास किराणा दुकानदार, ज्वेलर्स, ऑनलाइन व्यवहार करणारे व्यावसायिक आणि सर्वसामान्य ग्राहकांना सहन करावा लागत आहे. दुकानात ग्राहक आल्यानंतर ऑनलाइन पेमेंट करताना नेटवर्क नसल्यामुळे व्यवहार पूर्ण होत नाहीत. काही वेळा महत्त्वाचे फोनही लागत नसल्याने व्यावसायिक कामकाजावर परिणाम होत आहे.

विशेष म्हणजे, ग्राहक दर महिन्याला सुमारे ३०० ते ३५० रुपये रिचार्जसाठी खर्च करतात. मात्र, पैसे भरूनही मोबाईल सेवा सुरळीत मिळेल याची खात्री नसल्याने ग्राहकांमध्ये असंतोष आहे. मोफत सिमकार्ड देऊन ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या कंपन्यांनी आता नियमित रिचार्ज घेऊनही सेवा समाधानकारक द्यावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

नेटवर्कच्या सततच्या समस्येमुळे काही मोबाईलधारकांनी आपले सिमकार्ड बदलून इतर कंपन्यांच्या सेवा घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, परिसरातील नेटवर्कची समस्या कायम राहिल्यास ग्राहकांनी कोणत्या कंपनीकडे जावे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

साखरखेर्डा आणि परिसरातील गावांमधील मोबाईल नेटवर्कची समस्या संबंधित कंपन्यांनी गांभीर्याने घ्यावी. नेटवर्कमधील तांत्रिक अडचणी तपासून सेवा पूर्ववत करावी, तसेच ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

डिजिटल व्यवहार आणि ऑनलाइन सेवांवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली मोबाईल सेवा मिळणे ही आता गरज बनली आहे. त्यामुळे संबंधित मोबाईल कंपन्या या समस्येकडे कधी लक्ष देतात आणि साखरखेर्डा परिसरातील नेटवर्क सेवा कधी सुरळीत होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

📲 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या सर्वप्रथम मिळवा!

✅ WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा

वाचकांसाठी महत्त्वाचे

तुमच्या गावातही जिओ किंवा व्होडाफोन-आयडिया नेटवर्कची समस्या जाणवत आहे का? कोणत्या गावात आणि कोणत्या कंपनीचे नेटवर्क बंद आहे, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. नागरिकांच्या समस्या संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही माहिती महत्त्वाची ठरू शकते.

कट्टा न्यूज – जनतेच्या प्रश्नांना व्यासपीठ!

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

Leave a comment