KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

सुलतानपुरात वाहतूक कोंडीत संधी साधली! मंडळ अधिकाऱ्याच्या कारमधून ५० हजारांची रोकड, शासकीय लॅपटॉप चोरीला

On: November 6, 2026 5:31 PM
Follow Us:
सुलतानपूर येथे मंडळ अधिकाऱ्याच्या कारमधून रोकड आणि शासकीय लॅपटॉपची बॅग चोरी

सुलतानपूर | विनायक कुटे 

सुलतानपूर बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडीत अडकलेल्या मंडळ अधिकाऱ्याच्या चारचाकी वाहनातून अज्ञात चोरट्याने बॅग लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या बॅगेत ५० हजार रुपयांची रोकड, शासकीय लॅपटॉप आणि कार्यालयीन कागदपत्रे होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंडळ अधिकारी लक्ष्मण नारायण सानप हे मेहकर येथून लोणारकडे सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी जात होते. बुधवारी सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचे चारचाकी वाहन सुलतानपूर बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडीत अडकले होते.

याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या वाहनातील बॅग चोरून नेली. काही वेळाने बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यातील साहित्य आणि रोकड चोरीला गेल्याचे समोर आले. बॅगेत ५० हजार रुपये रोख, शासकीय कामकाजासाठी वापरण्यात येणारा लॅपटॉप तसेच कार्यालयीन कागदपत्रे होती.

सुलतानपूर बसस्थानक परिसरासारख्या वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रवासादरम्यान वाहनात रोकड, लॅपटॉप किंवा महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग ठेवताना नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. चोरीला गेलेली बॅग आणि त्यातील साहित्य शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.


अशाच स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी KattaNews.in ला भेट देत राहा.

📲 Join KattaNews WhatsApp Group ✅

वाचकांच्या माहितीसाठी संबंधित बातम्या

विनायक कुटे

विनायक कुटे हे कट्टा न्यूज (Kattanews.in) चे प्रतिनिधी असून सामाजिक, प्रशासकीय आणि जनहिताच्या विषयांवर सातत्याने वार्तांकन करतात. नियमभंग, नागरिकांच्या समस्या, सार्वजनिक हिताशी संबंधित प्रश्न आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणे, ही त्यांच्या पत्रकारितेची ओळख आहे. सत्य, अचूक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

सणासुदीत घरफोडी टाळण्यासाठी धाड पोलिसांनी नागरिकांना दिलेल्या सुरक्षा सूचना

सणासुदीत घर बंद करून बाहेर जाताय? धाड पोलिसांनी दिल्या महत्त्वाच्या सुरक्षा सूचना

रताळी येथे शेतकरी कुटुंबांशी चर्चा करताना आमदार रोहित पवार

रात्री ११ वाजता शेतकरी कुटुंबांचे अश्रू पुसण्यासाठी पोहोचले रोहित पवार; मदतीत अडवणूक झाल्यास थेट फोन करण्याचे आवाहन

मूर्ती येथील रमाई नगर दलित वस्ती सिमेंट रस्त्याच्या कामाची चौकशी

मूर्तीतील 4 लाखांच्या रस्त्याचे गौडबंगाल उघड! मंजुरी एका ठिकाणी, रस्ता दुसरीकडे; चौकशीत अंदाजपत्रकातील त्रुटी समोर

मोताळ्यात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून तहसीलदारांना निवेदन

सक्तीची कर्जवसुली थांबवा, स्मार्ट मीटर हटवा! मोताळ्यात वंचित बहुजन आघाडीचा प्रशासनाला अल्टिमेटम

देऊळगाव राजा पोलीस आणि तेलंगणा LCB प्रकरण

मामाच्या तक्रारीवरून अपहरणाची नोंद करण्याची देऊळगाव राजा पोलिसांना घाई का? तेलंगणा LCB प्रकरणात सवाल

जुने मंडपगाव शिवारात अवैध रेती वाहतुकीप्रकरणी जप्त केलेले नऊ टिप्पर

देऊळगाव राजा तालुक्यात अवैध रेती वाहतुकीवर महसूल-पोलिसांची धडक कारवाई; एकाच वेळी ९ टिप्पर जप्त

Leave a comment