maharashtra scholarship: राज्यात मुलीचे शिक्षणाचे प्रमाण वाढावे व गोरगरीब कुटुंबातील मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे हा दृष्टीकोन समोर ठेवून राज्यभरातील मुलींचा शिक्षणाचा टक्का वाढावा यासाठी शासनाने सावित्रीबाई फुले प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना अंमलात आणली. याअंतर्गत पाचवी ते दहावीच्या मुलींना ६०० रुपयांपासून 3000 पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते.
अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय, मुक्त जाती आणि भटक्या जमातींमधील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी असलेल्या या योजनेंतर्गत पात्र ठरणाऱ्या मुलींची शाळांमध्ये नियमित उपस्थिती असणे अनिवार्य आहे. अपवादवगळता शाळांतील त्यांची उपस्थिती किमान ७५ टक्के असल्यास त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना वर्षाकाठी एक हजार रुपये शिष्यवृत्ती देय असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यासाठी शाळांमधून समाजकल्याण विभागाकडे संबंधित विद्यार्थिनींची माहिती पाठविण्यात येते. तेथून शिष्यवृत्ती maharashtra scholarship मंजुरी झाल्यानंतर संबंधित विद्यार्थिनींच्या थेट बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाते.
maharashtra scholarship साठी अर्ज कसा करावा?
संबंधित प्रवर्गातील विद्यार्थिनींच्या पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत शिष्यवृत्तीसाठी शाळेच्या माध्यमातूनच समाज कल्याण विभागाकडे अर्ज भरावा.
maharashtra scholarship साठी निकष
■ शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थिनी अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय, मुक्त जाती आणि भटक्या जमातीं- मधील असावी.
■ पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र, मुख्याध्यापकांचा संबंधित प्रवर्गाचा दाखला आवश्यक. तसेच शाळेत ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे.
maharashtra scholarship साठी लागणारी कागदपत्रे ?
शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनीचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते, आधार कार्ड, मागील वर्षाचे गुणपत्रक, आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. ही सर्व माहिती शाळांमध्येच उपलब्ध असते. शाळांतील शिक्षक ती गोळा करून समाजकल्याण कार्यालयाकडे पाठवितात. त्या ठिकाणी तपासणी होऊन शिष्यवृत्ती मंजूर केली जाते.
सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना.
■ सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना इयत्ता पाचवी ते दहावीतील अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील मुलींसाठी राबविण्यात येते.
■ या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनीना शाळांमध्ये दैनंदिन उपस्थित राहणे अनिवार्य आहे. किमान ७५ टक्के उपस्थिती असल्यास ६०० रुपये दिले जातात. आठवी ते दहावीतील विद्यार्थिनींना प्रतिवर्षाला एक हजार रुपये दिले जातात.