हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

पावसाने पाठ फिरवली, शेतकरी हवालदिल; रूम्हणा गावात 90% पिके संकटात, हेक्टरी 1 लाख भरपाईची मागणी

On: September 18, 2026 7:19 PM
Follow Us:
सिंदखेडराजा तालुक्यातील रूम्हणा गावात पावसाअभावी संकटात आलेली तूर सोयाबीन आणि कापूस पिके

सिंदखेडराजा |समाधान सरकटे 

सिंदखेडराजा तालुक्यातील रूम्हणा गावातील शेतकऱ्यांसमोर पावसाअभावी मोठे संकट उभे राहिले आहे. गावातील शेतांमध्ये घेतलेली तूर, सोयाबीन आणि कापूस ही प्रमुख पिके पावसाच्या प्रतीक्षेत असून, सुमारे 90 टक्के पिके संकटात असल्याचा दावा शेतकरी योगेश सुखदेव जायभाये यांनी केला आहे.

पावसाने दडी मारल्याने पिकांना आवश्यक ओलावा मिळत नसून, उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. आधीच बियाणे, खते, औषधे, मशागत आणि इतर शेती खर्च वाढलेला असताना पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

रूम्हणा परिसरातील तूर, सोयाबीन आणि कापूस पिकांची प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी योगेश जायभाये यांनी केली आहे. पावसाअभावी परिस्थिती गंभीर होत असल्याने सिंदखेडराजा तालुक्यातील रूम्हणा गावात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशीही त्यांची मागणी आहे.

शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी शासनाने नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करून पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी योगेश सुखदेव जायभाये यांनी केली आहे.

पावसाने आणखी दडी मारल्यास पिकांची परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने रूम्हणा गावातील शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

📲 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या थेट मोबाईलवर!

स्थानिक बातम्या, शेतकऱ्यांच्या समस्या, ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी Katta News च्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

👉 WhatsApp Group Join करण्यासाठी येथे क्लिक करा

📢 तुमच्या गावातील बातमी आमच्यापर्यंत पोहोचवा!

तुमच्या गावात शेती, पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य किंवा प्रशासनाशी संबंधित समस्या असतील तर त्याची माहिती आणि फोटो Katta News कडे पाठवा. तुमचा आवाज योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी आम्ही बातमीला प्रसिद्धी देऊ.

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment