हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

देऊळगाव राजात काळीज पिळवटून टाकणारी घटना! पडक्या घरात अर्भकाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ उकलण्याचे पोलिसांसमोर आव्हान

On: August 26, 2026 7:18 AM
Follow Us:
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजात पडक्या घरात अर्भकाचा मृतदेह
देऊळगाव राजा | मनोहर खंदारे 

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संजय नगर परिसर हादरला आहे. एका पडक्या घरात अवघ्या दोन दिवसांच्या अर्भकाचा मृतदेह आढळून आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. विशेष म्हणजे, शाळेतून घरी परतणाऱ्या काही चिमुकल्यांच्या हा प्रकार प्रथम निदर्शनास आला. पडक्या घरात कुत्री आणि तिची पिल्ले राहत असलेल्या ठिकाणी अर्धवट कुरतडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. नेमके हे अर्भक तिथे कसे पोहोचले? त्याचा मृत्यू कशामुळे झाला? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.देऊळगाव राजा शहरातील संजय नगर परिसरात मंगळवारी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शाळेतून परतणाऱ्या काही मुलांना पडक्या घरात काहीतरी अर्धवट कुरतडलेल्या अवस्थेत दिसले. सुरुवातीला ते नेमके काय आहे, याबाबत मुलांमध्ये चर्चा सुरू झाली. त्यानंतर काही मुलांनी हा लहान मुलाच्या शरीराचा भाग असू शकतो, असे सांगितले. ही माहिती परिसरात पसरल्यानंतर नागरिकांमध्ये खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, या पडक्या वाड्यात मागील काही दिवसांपासून एक कुत्री आणि तिची चार-पाच पिल्ले राहत होती. त्याच ठिकाणी अर्भकाचा मृतदेह आढळून आल्याने या घटनेबाबत परिसरात विविध चर्चा सुरू झाल्या. मात्र, घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक नमुने आणि पुरावे संकलित केले. या पुराव्यांच्या आधारे तपासाला दिशा देण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

अर्भकाचा मृतदेह नेमका किती दिवसांपासून त्या ठिकाणी होता, त्याचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला आणि हा प्रकार नेमका कोणी केला, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच अर्भक स्त्री जातीचे आहे की पुरुष जातीचे, याबाबतही तपासानंतर अधिकृत माहिती स्पष्ट होणार आहे.

या प्रकरणी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी दावल शेख फरीद यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम ९४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वृत्त लिहेपर्यंत या प्रकरणात कोणालाही ताब्यात घेण्यात आले नव्हते. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

📲 बुलढाणा आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा

स्थानिक घडामोडी, महत्त्वाच्या बातम्या आणि ताजे अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.


👉 Join WhatsApp Group

हेही वाचा :

🔹चाकू हल्ल्याने धाड हादरले! दोन जणांवर वार करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक; न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी

🔹 Buldhana News: एक टायर फुटला अन् क्षणात सगळं संपलं! समृद्धी महामार्गावर स्कॉर्पिओचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू,९ गंभीर

🔹महाराष्ट्रातील 14 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींचा कारभार पुन्हा पेचात; प्रशासकांची मुदत संपली, आता सूत्रे कोणाकडे ?

तुमच्या परिसरातील महत्त्वाची बातमी आमच्यापर्यंत पोहोचवा. स्थानिक घटना, नागरिकांच्या समस्या आणि महत्त्वाच्या घडामोडींची माहिती आम्हाला पाठवा.

मनोहर खंदारे

मनोहर खंदारे हे कट्टा न्यूजचे प्रतिनिधी असून महाराष्ट्रातील स्थानिक, सामाजिक, राजकीय आणि ग्रामीण भागातील ताज्या घडामोडींवर बातम्या देतात. स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या समस्या आणि महत्त्वाच्या घटनांची अचूक व विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे ते काम करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पिक कर्जासाठी स्टॅम्प पेपरच्या सक्तीबाबत बँकांना निर्देश

पिक कर्जासाठी १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर नको; संजय खडसेंचे बँकांना स्पष्ट निर्देश

सोमठाणा तिहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपीच्या आत्मसमर्पणाची बातमी

सोमठाणा तिहेरी हत्याकांडात मोठी घडामोड; मुख्य आरोपी दीपक सुरडकर पनवेलमध्ये शरण, मुलालाही अटक

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात MPSC विद्यार्थ्यांचे निवेदन

MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी डॉ. ज्योतीताई खेडेकर मैदानात; ३५० ते ४०० विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

चिखली तालुक्यात अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाची कारवाई

चिखलीत अनधिकृत पाणी उपसा केल्यास पंप जप्त होणार; वीजपुरवठा खंडित करण्याचाही इशारा

सोमठाण्यात तिहेरी हत्याकांड; आई, भाऊ आणि पुतण्याची हत्या

जन्मदात्या आईसह सख्खा भाऊ आणि तरुण पुतण्याची धारदार चाकूने हत्या; सोमठाणा येथील तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण चिखली तालुका हादरला

भानगुरा जिल्हा परिषद शाळेत महिला शिक्षिकेची मागणी

महिला शिक्षिकेची मागणी; भानगुरा शाळेत शिक्षकपदाचा प्रश्न ऐरणीवर, दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे बंद

Leave a comment