हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

लोणार तालुक्यात ग्रामसभांवर बहिष्कार! ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांचा एकमुखी निर्णय

On: August 19, 2026 2:53 PM
Follow Us:
लोणार तालुक्यात ग्रामसभांवर बहिष्काराचा निर्णय घेतलेले ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी
लोणार | मेराज पठाण 

लोणार तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी एकत्रितपणे ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने आता तालुक्यातील ग्रामसभा होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य संघटनेच्या आदेशानंतर घेतलेल्या या निर्णयाची अधिकृत माहिती पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी राज्य संघटना (डी.एन.ई. १३६) यांच्या आदेशानुसार लोणार तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. १८ ऑगस्ट २०२६ रोजी राज्य संघटनेने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तालुक्यात करण्यात येत आहे.

📲 लोणार आणि बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा

स्थानिक बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी Katta News च्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

👉 WhatsApp Group Join करा

याबाबत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या वतीने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO)यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनातून संघटनेची आंदोलनात्मक भूमिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे.

या निर्णयानुसार तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचे आयोजन न करणे, ग्रामसभेची नोटीस न काढणे तसेच ग्रामसभेचे सचिव म्हणून इतिवृत्त नोंदविण्यासह संबंधित वैधानिक कामकाज न करण्याची भूमिका घेण्यात आली आहे.

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवरील वाढता कामाचा ताण, सेवाविषयक अडचणी आणि शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रलंबित मागण्यांवर शासन स्तरावर ठोस निर्णय होईपर्यंत बहिष्काराचे आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका संघटनेने घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात लोणार तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामसभांच्या कामकाजावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

ग्रामसभा न झाल्यामुळे ग्रामीण भागातील विकासकामे किंवा प्रशासकीय निर्णय लांबणीवर पडल्यास त्याची जबाबदारी शासन आणि संबंधित विभागाची राहील, अशी स्पष्ट पूर्वकल्पना निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आली आहे.

निवेदन सादर करताना लोणार तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्य संघटनेच्या आदेशानुसार या आंदोलनात १०० टक्के सहभागी होण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

📢 तुमच्या गावातील बातमी आमच्यापर्यंत पोहोचवा!

गावातील महत्त्वाची घटना, प्रशासनाशी संबंधित प्रश्न किंवा स्थानिक घडामोडी असल्यास Katta News कडे बातमी पाठवा.

बातमी पाठवण्यासाठी येथे क्लिक करा

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment