हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

स्वातंत्र्य दिनी देऊळगाव राजात रक्तदानाचा महायज्ञ; ६७ रक्तदात्यांनी दिले जीवनदान

On: August 16, 2026 5:09 PM
Follow Us:
देऊळगाव राजा रक्तदान शिबिरात ६७ रक्तदात्यांचा सहभाग

देऊळगाव राजा : मनोहर खंदारे

स्वातंत्र्य दिनी देशभक्तीचा उत्साह साजरा करत असतानाच देऊळगाव राजातील ६७ नागरिकांनी रक्तदान करून माणुसकीचा आदर्श घालून दिला. श्री समर्थ हॉस्पिटल व गणराज मेडिकल, सातेफळ रोड, देऊळगाव राजा येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आयोजित या उपक्रमात युवकांसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी सहभाग घेतला. ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ या भावनेतून झालेल्या या रक्तदान शिबिरातून स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशसेवेसोबतच समाजसेवेचाही प्रेरणादायी संदेश देण्यात आला.

या रक्तदान शिबिराचे आयोजन सामाजिक बांधिलकी जपत करण्यात आले होते. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर मदत मिळावी आणि नागरिकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.

या शिबिरात युवकांसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केले. ६७ रक्तदात्यांनी केलेले रक्तदान गरजू रुग्णांसाठी निश्चितच मोलाचे ठरणार आहे.

या रक्तदान शिबिराचे आयोजन डॉ. पंकज धोंडरकर (श्री समर्थ हॉस्पिटल), नितेश राठोड व विशाल राठोड (गणराज मेडिकल), सूरज बल्लाळ (मंगल क्लिनिकल लॅब), बंडूराजे डोळस (तालुका अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना), नवनाथ रामाणे (शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना), आकाश डोळस (शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना), शेख शहजाद भाई (विधानसभा अध्यक्ष), सचिन विधाते, विशाल गोरे आणि देवानंद गोरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून करण्यात आले.

रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशसेवेबरोबरच समाजसेवेचा संदेश देत नागरिकांनी केलेले रक्तदान हे प्रेरणादायी ठरले.

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, वैद्यकीय कर्मचारी तसेच सहकार्य करणाऱ्या नागरिकांनी परिश्रम घेतले.

📲 KattaNews च्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा

महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, स्थानिक अपडेट्स आणि महत्त्वाच्या घडामोडी थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा.


👉 WhatsApp ग्रुप जॉईन करा

मनोहर खंदारे

मनोहर खंदारे हे कट्टा न्यूजचे प्रतिनिधी असून महाराष्ट्रातील स्थानिक, सामाजिक, राजकीय आणि ग्रामीण भागातील ताज्या घडामोडींवर बातम्या देतात. स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या समस्या आणि महत्त्वाच्या घटनांची अचूक व विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे ते काम करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

बुलढाण्यात जिल्हा नियोजन समितीच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन

बुलढाण्यात जिल्हा नियोजन समितीच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन; १.५८ कोटींच्या निधीतून आधुनिक सुविधा

चौथा ग्रामपंचायतीत ८०वा स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

चौथा ग्रामपंचायतीत स्वातंत्र्य दिन उत्साहात; वृक्षारोपणासह शहीद पंढरीनाथ नप्ते यांना अभिवादन

संत गजानन महाराजांच्या पालखी दर्शनासाठी जाणाऱ्या ऑटोचा सुलतानपूर-भानापूर मार्गावर अपघात

संत गजानन महाराजांच्या पालखी दर्शनाला जात असताना काळाचा घाला; ऑटो रिक्षा विद्युत खांबावर आदळली, एका भाविकाचा जागीच मृत्यू

गवंढाळा ग्रामपंचायत अधिकारी निलंबित

“जनतेच्या पैशांचा हिशेब द्यावाच लागेल!”; गवंढाळा ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर अखेर निलंबनाची कारवाई

चिखलीतील श्रीराम पतसंस्था ते बैल जोडी चौक रस्त्याची दुरवस्था आणि मनसे आंदोलनाचा इशारा

चिखलीत श्रीराम पतसंस्था ते बैल जोडी चौक रस्त्याचा प्रश्न पेटला; ३-४ दिवसांत काम सुरू करा, मनसेचा आंदोलनाचा इशारा

कोलारा गावातील दूषित पाण्याच्या प्रश्नावर मनसेची फिल्टर प्लांटची मागणी

कोलारा गावच्या दूषित पाण्यावर मनसे आक्रमक; BDO यांना धारेवर धरत फिल्टर प्लांटची जोरदार मागणी

Leave a Comment