जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या दुसऱ्या मजल्यावर जिल्हा नियोजन समितीच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नव्या कार्यालयामुळे जिल्हा नियोजन समितीचे प्रशासकीय कामकाज अधिक सुसूत्र, गतिमान आणि कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे.
यावेळी आमदार मनोज कायदे, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार यांच्यासह जिल्हा नियोजन समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नवीन कार्यालयामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ५ स्वतंत्र केबिन तसेच १० क्युबिकल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यालयीन कामकाज अधिक सुसूत्र आणि कार्यक्षम पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या कार्यालयाच्या बांधकाम आणि फर्निचरसाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत १ कोटी ५८ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या निधीतून कार्यालयासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि फर्निचरची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध विकासकामांचे नियोजन आणि त्यासंदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया पार पाडली जाते. नव्या कार्यालयामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अधिक चांगले कार्यक्षेत्र उपलब्ध झाले असून, समितीचे कामकाज अधिक प्रभावीपणे पार पाडण्यास मदत होणार आहे.
📲 बुलढाण्यासह महाराष्ट्रातील kattanews च्या ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा!
संबंधित बातम्या
- ₹२००० चा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार; राज्य शासनाचा मोठा निर्णय, पहा संपूर्ण माहिती!
- पुढील ४८ तास धोक्याचे! महाराष्ट्रातील ‘या’ १४ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा हाय अलर्ट; IMD चा नवा अंदाज
- संत गजानन महाराजांच्या पालखी दर्शनाला जात असताना काळाचा घाला; ऑटो रिक्षा विद्युत खांबावर आदळली, एका भाविकाचा जागीच मृत्यू










