हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

संत गजानन महाराजांच्या पालखी दर्शनाला जात असताना काळाचा घाला; ऑटो रिक्षा विद्युत खांबावर आदळली, एका भाविकाचा जागीच मृत्यू

On: August 15, 2026 10:08 AM
Follow Us:
संत गजानन महाराजांच्या पालखी दर्शनासाठी जाणाऱ्या ऑटोचा सुलतानपूर-भानापूर मार्गावर अपघात

सुलतानपूर | विनायक कुटे 

श्री संत गजानन महाराजांच्या पालखी दर्शनासाठी सुलतानपूरकडे येणाऱ्या भाविकांच्या ऑटो रिक्षाचा शुक्रवारी सुलतानपूर-भानापूर मार्गावर भीषण अपघात झाला. उदनापूर येथून सुलतानपूरच्या दिशेने येणाऱ्या ऑटो रिक्षावरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि रिक्षा रस्त्यालगत असलेल्या विद्युत खांबावर जाऊन आदळली. या अपघातात भगवान शामराव मुळे (वय ७०, रा. उदनापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. ऑटोमधील इतर काही प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे सुलतानपूर येथे आगमन झाल्याने पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी सुलतानपूरकडे येत होते. याचदरम्यान उदनापूर येथून भाविकांना घेऊन सुलतानपूरकडे येणाऱ्या ऑटो रिक्षाचा हा दुर्दैवी अपघात झाला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ऑटो रिक्षा सुलतानपूरच्या दिशेने येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ऑटो थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबावर जाऊन आदळली. अपघातात ऑटोचे मोठे नुकसान झाले असून, त्यातील काही प्रवासी गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी जखमी प्रवाशांना ऑटोतून बाहेर काढून तातडीने उपचारासाठी मेहकर येथे हलविले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

या अपघातात भगवान शामराव मुळे यांचा जागीच मृत्यू झाला. वृत्त लिहेपर्यंत इतर जखमी प्रवाशांची नावे समजू शकलेली नाहीत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत पुढील तपास सुरू आहे.

पालखी दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या ऑटोला झालेल्या या भीषण अपघातामुळे सुलतानपूर आणि उदनापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

📲 KattaNews WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

बुलढाणा आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

👉 WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

हेही वाचा:

विनायक कुटे

विनायक कुटे हे कट्टा न्यूज (Kattanews.in) चे प्रतिनिधी असून सामाजिक, प्रशासकीय आणि जनहिताच्या विषयांवर सातत्याने वार्तांकन करतात. नियमभंग, नागरिकांच्या समस्या, सार्वजनिक हिताशी संबंधित प्रश्न आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणे, ही त्यांच्या पत्रकारितेची ओळख आहे. सत्य, अचूक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी सिंदखेडराजा तहसीलसमोर नागपूर कराराची होळी करताना कार्यकर्ते

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी सिंदखेडराजा तहसीलसमोर नागपूर कराराची होळी

काटेपांग्री पाणी पुरवठा बंद असल्याने ओसाड पडलेला जलकुंभ

काटेपांग्री पाणी पुरवठा २५ दिवसांपासून बंद; वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्याचे काम ठप्प, ग्रामस्थ हैराण

डोणगाव पोलीस स्टेशन येथे आदिवासी समाज बांधवांचा घेराव आंदोलन

आरोपींना अटक होईपर्यंत जाणार नाही; नागेशवाडी प्रकरणावरून डोणगाव पोलीस ठाण्यात आदिवासी बांधवांचा ठिय्या

निलगायीच्या धडकेत अपघात झालेले शिवाजी धोंडूजी तुपकर

गुंज गावात हळहळ: निलगायीच्या धडकेत झालेल्या अपघातात जखमी मजुराचा अखेर मृत्यू

बुलढाणा दुष्काळ नुकसान भरपाई मागणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर एकनाथ शिंदे यांची भेट

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ नुकसान भरपाई मिळणार? आमदार खेडेकरांच्या मागणीनंतर शिंदेंचं मोठं आश्वासन

रताळी येथील शेतकरी पुत्र आकाश बळीराम पाटील आत्महत्या

दुष्काळ जाहीर होण्याच्या काही तास आधीच रताळीत शेतकरी पुत्राची आत्महत्या; शेतीचे नुकसान अन् कर्जाचा ताण

Leave a comment