हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

वैमानिक होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले; बुट्टा तांड्याच्या २४ वर्षीय स्वप्निलचा अपघाती मृत्यू, सिंदखेड राजा तालुक्यात हळहळ

On: August 13, 2026 9:44 AM
Follow Us:
बुट्टा तांड्याचा वैमानिक प्रशिक्षणार्थी स्वप्निल चव्हाण
सिंदखेड राजा | प्रतिनिधी : समाधान सरकटे 

वैमानिक होऊन आकाशात भरारी घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बुट्टा तांडा येथील २४ वर्षीय स्वप्निल युवराज चव्हाणचा अपघाती मृत्यू झाला. वैमानिक प्रशिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात असताना २३ जुलै रोजी अलिगड येथे त्याच्या मोटारसायकलला ट्रकने धडक दिली होती. गंभीर जखमी स्वप्निलवर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू होते. मात्र, ११ ऑगस्टच्या मध्यरात्री उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेने बुट्टा तांडा आणि सिंदखेड राजा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

स्वप्निल चव्हाण हा बुट्टा तांडा येथील मूळ रहिवासी होता. त्याचे वडील युवराज चव्हाण हे नरेंद्र महाराज संस्थान, नानीज येथे कर्मचारी म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत होते. कुटुंबाचा संसार सांभाळतानाच त्यांनी मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. लॉकडाउननंतर चव्हाण कुटुंब छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक झाले.

स्वप्निलने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर देवगिरी महाविद्यालयात बी.टेक. शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्यानंतर वैमानिक होण्याच्या ध्येयाने त्याने महाज्योतीच्या माध्यमातून वैमानिक प्रशिक्षणासाठी परीक्षा दिली. या परीक्षेत त्याने राज्यात चौथा क्रमांक मिळवला. त्यानंतर त्याची उत्तर प्रदेशातील अलिगड येथे वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड झाली.

मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर स्वप्निलचे वैमानिक प्रशिक्षण पुढे सुरू होते. विशेष म्हणजे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात पोहोचले होते. त्यामुळे लवकरच वैमानिक होऊन आकाशात भरारी घेण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण होईल, अशी आशा कुटुंबीयांना होती. मात्र, नियतीने या स्वप्नाला अचानक ब्रेक लावला.

२३ जुलै रोजी मित्रांसोबत मोटारसायकलवरून अलिगड येथे जात असताना स्वप्निलच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात त्याच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात स्वप्निलच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. उपचार सुरू असल्याने तो लवकर बरा होऊन पुन्हा वैमानिक प्रशिक्षण पूर्ण करेल, अशी अपेक्षा कुटुंबीयांना होती. मात्र, ११ ऑगस्ट रोजी रात्री स्वप्निलने नातेवाइकांना दम लागत असल्याचे सांगितले. त्यानंतर मध्यरात्री उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

दरम्यान, औषधांच्या दुष्परिणामामुळे स्वप्निलची प्रकृती बिघडली आणि त्यातून त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता नातेवाइकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, स्वप्निलच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.

स्वप्निलच्या वैमानिक प्रशिक्षणाबाबत त्याचे वडील युवराज चव्हाण यांनीही काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, महाज्योतीकडून प्रशिक्षणासाठी निवड झाल्यानंतर पालकांकडून करारनामा करण्यात आला होता. प्रशिक्षण दोन वर्षांत पूर्ण करण्याचे सांगण्यात आले होते आणि प्रशिक्षणासाठी लागणारा सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांचा खर्च संस्था करणार असल्याचे सांगण्यात आले होते.

मात्र, प्रशिक्षण मध्येच सोडल्यास झालेला ३५ ते ४० लाख रुपयांचा खर्च पालकांकडून दंड म्हणून वसूल करण्याची अट करारनाम्यात असल्याचे युवराज चव्हाण यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, तीन वर्षे होऊनही स्वप्निलचे प्रशिक्षण पूर्ण झाले नव्हते. प्रशिक्षण दोन वर्षांत पूर्ण झाले असते, तर स्वप्निलला अलिगड येथे राहावे लागले नसते आणि कदाचित हा अपघात टळला असता, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

स्वप्निलवर बुट्टा तांडा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या मुलाने वैमानिक होऊन आकाशात भरारी घ्यावी, असे स्वप्न पाहणाऱ्या कुटुंबावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका होतकरू तरुणाचा असा अचानक मृत्यू झाल्याने ग्रामस्थ आणि नातेवाईकांमध्येही शोककळा पसरली आहे.

स्वप्निलच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, दोन बहिणी, काका आणि काकू असा परिवार आहे. वैमानिक होऊन आकाशात भरारी घेण्याचे त्याचे स्वप्न मात्र कायमचे अधुरे राहिले.

📲 KattaNews WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा

सिंदखेड राजा, बुलढाणा आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवा.

👉 WhatsApp ग्रुप जॉईन करा

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

बुलढाणा जिल्हा बँकेचे १२ संचालक बिनविरोध

बुलढाणा जिल्हा बँकेचे १२ संचालक बिनविरोध; शिंगणे गटाचे सहकारात वर्चस्व, अजित पवार गटाची खेळी कितपत यशस्वी होणार?

शेंदुर्जनमध्ये एकाच घरात चार दिवसांत दोनदा चोरी

४ दिवसांत एकाच घरात सलग दोनदा चोरी; पहिल्यांदा सोनं-रोख लुटलं, दुसऱ्यांदा मौल्यवान साड्यांवर डल्ला

पेनटाकळी धरणात ३५ वर्षीय विष्णू राजेकर यांची आत्महत्या

पेनटाकळी धरणात ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; रात्री घरातून निघाला, सकाळी मृतदेह आढळला

इब्राहिम बारुदवाला यांनी उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार यांची घेतलेली भेट

उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवारांची इब्राहिम बारुदवाला यांनी घेतली सदिच्छा भेट; बुलढाण्याच्या प्रश्नांवर झाली सविस्तर चर्चा

संघपाल पनाड आणि दिपक अंभोरे यांची रिपब्लिकन सेनेत नियुक्ती

रिपब्लिकन सेनेत मोठ्या नियुक्त्या; संघपाल पनाड जिल्हाध्यक्ष, दिपक अंभोरे तालुकाध्यक्ष

लोणार पिंपळनेर जिल्हा परिषद शाळेतील स्वच्छतागृहांची दुरवस्था

लोणारच्या पिंपळनेर शाळेतील स्वच्छतागृहांची अवस्था पाहून धक्का; विद्यार्थ्यांसाठी सुविधा की आजारांचे घर?

Leave a Comment