KattaNews नवीन जाहिरात KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

मेहकरमध्ये १६ ऑगस्टला ‘आमदार मॅरेथॉन २०२६’; ५ आणि १० किमी स्पर्धेत धावणार युवक-युवती

On: August 11, 2026 2:36 PM
Follow Us:
मेहकरमध्ये १६ ऑगस्टला आयोजित आमदार मॅरेथॉन २०२६
मेहकर |विनायक कुटे  

KattaNews जाहिरात 1

आमदार सिद्धार्थ खरात यांच्या वाढदिवसानिमित्त मेहकर शहरात ‘मी धावतो मेहकरसाठी’ या संकल्पनेतून ‘आमदार मॅरेथॉन २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना, युवासेना मेहकर आणि क्रीडाप्रेमींच्या वतीने रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६ वाजता जानेफळ चौक, मेहकर येथे या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

KattaNews जाहिरात 2

आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यासोबतच युवक-युवतींमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण करणे आणि शहरातील क्रीडाप्रेमींना एकत्र आणणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. स्पर्धेत ५ किलोमीटर आणि १० किलोमीटर अशा दोन गटांत मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

KattaNews जाहिरात 3

या स्पर्धेतील विजेत्या धावपटूंना आकर्षक पारितोषिकांसह चषक देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी १,१११ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७७७ रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ५५५ रुपये अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. याशिवाय स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व धावपटूंना सहभागी मेडल देण्यात येणार आहे.

KattaNews जाहिरात 4

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांसाठी टी-शर्ट आणि अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे मेहकर शहरासह परिसरातील धावपटू, युवक-युवती, व्यावसायिक आणि क्रीडाप्रेमी नागरिकांनी या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

‘मी धावतो मेहकरसाठी’ या संकल्पनेतून आयोजित होणाऱ्या या मॅरेथॉनमुळे शहरात आरोग्य, फिटनेस आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्पर्धेतील सहभाग, नोंदणी आणि अधिक माहितीसाठी आयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेना, युवासेना मेहकर आणि क्रीडाप्रेमी मेहकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

📲 मेहकर आणि बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा

👉 WhatsApp ग्रुप Join करा

विनायक कुटे

विनायक कुटे हे कट्टा न्यूज (Kattanews.in) चे प्रतिनिधी असून सामाजिक, प्रशासकीय आणि जनहिताच्या विषयांवर सातत्याने वार्तांकन करतात. नियमभंग, नागरिकांच्या समस्या, सार्वजनिक हिताशी संबंधित प्रश्न आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणे, ही त्यांच्या पत्रकारितेची ओळख आहे. सत्य, अचूक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पेनटाकळी धरणाच्या पाणीप्रश्नावर सिद्धार्थ खरात, प्रतापराव जाधव, संजय रायमुलकर आणि श्वेता महाले यांच्या भूमिका दर्शवणारे राजकीय विश्लेषण

पेनटाकळीच्या पाण्यात राजकारणाचे प्रतिबिंब! कुणी जनतेचा कैवारी ठरला, तर कुणी श्रेयाच्या स्पर्धेत उतरला ?

मेहकर-सुलतानपूर महामार्गावर एसटी बस अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; मेहकर-सुलतानपूर महामार्गावर एसटी बसच्या धडकेत ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

वरुडी ग्रामपंचायतीला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात २० लाखांचा पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद साजरा करताना पदाधिकारी

सिंदखेडराजा तालुक्यातील वरुडी गावाचा राज्यस्तरावर गौरव! मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात २० लाखांचा पुरस्कार जाहीर.

घाटबोरी सागवान वृक्षतोड प्रकरणात तिसरा आरोपी अटकेत

घाटबोरी वनक्षेत्रातील सागवान वृक्षतोड प्रकरणात तिसरा आरोपी अटकेत; न्यायालयाकडून ३ दिवसांची वनकोठडी

देऊळगाव राजा येथे निकृष्ट रेशन तांदळाच्या निषेधार्थ संतोष भुतेकर यांनी तहसील कार्यालयात तांदूळ भेट दिला

देऊळगाव राजात निकृष्ट रेशन तांदळाचा अनोखा निषेध; पुरवठा अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून दिला तांदूळ!

बुलढाणा न्यायालयाने चिखलीतील बालिका अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास सुनावला

बुलढाणा न्यायालयाचा मोठा निर्णय! चिखलीतील ८ वर्षीय बालिकेवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास

Leave a comment