बुलढाणा : प्रा.दिलीप नाईकवाड
सामाजिक कार्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत अभिनेत्री व पत्रकार किरण वाघ यांचा राष्ट्रीय स्तरावरील ‘साई प्रेरणा गौरव पुरस्कार’ देऊन शिर्डी येथे गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे हा पुरस्कार ज्येष्ठ मराठी चित्रपट अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्याने किरण वाघ यांच्या सन्मानाला अधिक प्रतिष्ठा लाभली.
ओम साई विकास प्रतिष्ठान आणि बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ‘साई प्रेरणा गौरव पुरस्कार’ वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, पत्रकार आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दिमाखदार सोहळ्यात सामाजिक, सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.
यावेळी अभिनेत्री व पत्रकार किरण वाघ यांना ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते ‘साई प्रेरणा गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर किरण वाघ यांनी आयोजकांचे तसेच उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. पत्रकारिता आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे कार्य भविष्यातही अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
किरण वाघ यांनी पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल साधत विविध सामाजिक प्रश्नांवर सातत्याने जनजागृती केली आहे. समाजहिताच्या विषयांवर त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून त्यांच्या या सन्मानामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे आयोजन सुदाम संसारे यांनी केले होते. संपूर्ण सोहळ्याचे नियोजन, शिस्तबद्ध आयोजन आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल आयोजकांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला विशेष रंगत आली.
संबंधित बातम्या
- राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू; बळजबरीच्या धर्मांतरावर 7 वर्षांपर्यंत शिक्षा, जाणून घ्या काय आहेत नव्या तरतुदी
- न्याय देणाऱ्यांच्या दारातच भ्रष्टाचार! मेहकर न्यायालयात खळबळ; वॉरंट थांबवण्यासाठी बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात
- देवीसमोर हात जोडले, नंतर त्याच गाभाऱ्यात चोरी केली! मर्दडीच्या जागृत देवस्थानातील धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद










