हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

सिंदखेडराजा: रोही (नीलगायी)च्या कळपाने दोन एकरांतील कपाशी उद्ध्वस्त; शेतकरी राम रतन पवार यांचे मोठे नुकसान, भरपाईची मागणी

Follow Us:
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा येथे रोही (नीलगायी)च्या कळपाने शेतकरी राम रतन पवार यांच्या दोन एकरांतील कपाशी पिकाचे केलेले नुकसान

सिंदखेडराजा |प्रा.दिलीप नाईकवाड

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा परिसरातील शेतकरी राम रतन पवार यांच्यावर यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच मोठे संकट कोसळले आहे. गट क्रमांक ५९४ मधील सुमारे दोन एकर क्षेत्रात लागवड केलेल्या कपाशी पिकावर रात्रीच्या वेळी रोही (नीलगायी)च्या कळपाने धाड टाकत संपूर्ण पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याची घटना समोर आली आहे. नुकतीच उगवलेली आणि वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असलेली कपाशीची रोपे तुडवून व मोडून टाकल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून यंदाच्या उत्पादनाबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे.

घटनास्थळी पाहणी केली असता शेतामध्ये मोठ्या प्रमाणात तुडवलेली कपाशीची रोपे, नीलगायींच्या पायांचे ठसे आणि पिकाच्या नुकसानीच्या स्पष्ट खुणा दिसून आल्या. शेतकरी राम रतन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या अंधारात रोहीच्या कळपाने शेतात प्रवेश करून दोन एकरांतील कपाशी पीक अक्षरशः उद्ध्वस्त केले. काही तासांतच अनेक दिवसांच्या मेहनतीवर पाणी फिरल्याने शेतकरी कुटुंब मोठ्या चिंतेत सापडले आहे.

यंदा आधीच बदलत्या हवामानामुळे आणि शेतीसाठी वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यात वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नुकसान सातत्याने वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी अधिक गंभीर होत आहेत. पेरणी, बियाणे, खते, औषधे आणि मशागतीवर मोठा खर्च करून उभे केलेले पीक काही क्षणांत नष्ट होत असल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडत आहेत.

जांभोरा आणि परिसरातील अनेक गावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून रोही (नीलगायी)ंचा वावर लक्षणीय वाढला आहे. कपाशी, सोयाबीन, तूर, हरभरा यांसारख्या पिकांचे वारंवार नुकसान होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून सातत्याने करण्यात येत आहेत. अनेक वेळा शेतकऱ्यांना रात्री शेतात पहारा द्यावा लागत असला तरी मोठ्या कळपांमुळे पिकांचे संरक्षण करणे कठीण ठरत असल्याचे स्थानिक शेतकरी सांगतात.

राम रतन पवार यांनी महसूल विभाग आणि कृषी विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा, झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून शासनाकडून योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच रोहीच्या वाढत्या उपद्रवावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी वन विभागानेही प्रभावी पावले उचलावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

परिसरातील इतर शेतकऱ्यांनीही शासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीसाठी प्रभावी धोरण राबवावे, अशी मागणी केली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास आगामी काळात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

वाचकांसाठी सूचना

आपल्या परिसरातही अशाच प्रकारची घटना घडली असल्यास फोटो, व्हिडिओ आणि संपूर्ण माहिती KattaNews.in कडे पाठवा. सत्य, अचूक आणि विश्वासार्ह स्थानिक बातम्या सर्वप्रथम वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

 

प्रा. दिलीप नाईकवाड

प्रा. दिलीप नाईकवाड हे Katta News साठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून बातम्या देतात. ते राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैचारिक विषयांवर वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक लेखन करतात. ते मागील 15+ वर्षांपासून शिक्षण व वैचारिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

सिंदखेडराजा दुष्काळ बाबत डॉ शशिकांत खेडेकर यांचे प्रशासनाला निवेदन

पावसाने पाठ फिरवली, सिंदखेडराजा तालुक्यातील खरीप पिके संकटात; माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांची प्रशासनाला थेट भेट

चिखलीतील उपवर्गीकरण विरोधी महामोर्चात आनंदराज आंबेडकर

चिखलीत उपवर्गीकरणाविरोधात हजारो भीमसैनिकांचा महामोर्चा; आनंदराज आंबेडकर म्हणाले, ‘५९ जातींची एकजूट कायम ठेवा’

मोताळा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार संजुभाऊ गायकवाड यांची पाहणी

मोताळ्यात दुष्काळाचे सावट: आमदार संजुभाऊ गायकवाड यांचा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट संवाद

महाराष्ट्रात पाऊस 12 13 सप्टेंबर 2026 IMD अंदाज

महाराष्ट्रात पावसाची एन्ट्री! 12 आणि 13 सप्टेंबरला ‘या’ भागात कोसळणार जोरदार पाऊस

देऊळगाव राजा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीचे मनसेचे निवेदन

देऊळगाव राजा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; मनसेचा तहसीलदारांना इशारा

बुलढाण्यातील पळसखेड चक्का येथील मुंढे परिवारातील दोन चुलते-पुतण्यांच्या निधनाची बातमी

एकाच परिवारातील दोन आधारवड हरपले; देशसेवेतील सुभेदार पुत्र वडिलांच्या अखेरच्या निरोपापासून दूर

Leave a Comment