हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मंडपगावात रेती माफियांवर महसूल विभागाचा मोठा दणका! अवैध रेती वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर जप्त

On: July 27, 2026 8:00 AM
Follow Us:
मंडपगाव येथे अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करताना महसूल विभागाची कारवाई

देऊळगाव राजा| राहुल नायर 

अवैध रेती उपसा आणि वाहतुकीविरोधात महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील मंडपगाव येथे अवैधरीत्या रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे परिसरातील अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6:45 वाजता मंडपगाव परिसरात अवैध रेती वाहतूक सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. माहिती मिळताच महसूल विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासणी केली.तपासणीदरम्यान दोन ट्रॅक्टरमध्ये अवैधरीत्या रेती वाहतूक होत असल्याचे आढळून आले. दोन्ही ट्रॅक्टरमध्ये प्रत्येकी 1 ब्रास प्रमाणे एकूण 2 ब्रास रेती भरलेली होती.

रेती वाहतुकीसाठी आवश्यक असलेली कोणतीही कायदेशीर परवानगी नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महसूल विभागाने दोन्ही ट्रॅक्टर तात्काळ जप्त केले.

ही कारवाई ग्राम महसूल अधिकारी ज्ञानेश्वर तांबे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी शिपाई अर्जुन सोनसळे यांनी सहकार्य केले.

जप्त करण्यात आलेले दोन्ही ट्रॅक्टर पुढील दंडात्मक आणि कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन देऊळगाव राजा येथे जमा करण्यात आले आहेत.

अवैध रेती उपसा आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाकडून यापुढेही अशाच प्रकारच्या कारवाया सातत्याने करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मंडपगाव परिसरात झालेल्या या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

📲 ब्रेकिंग न्यूज सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Group मध्ये आजच सहभागी व्हा.
👉 Join WhatsApp Group

📢 KattaNews अपडेट मिळवा

महाराष्ट्रातील ताज्या स्थानिक बातम्या, शेतकरी योजना, सरकारी निर्णय आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी KattaNews.in ला भेट देत रहा.

राहुल नायर

राहुल नायर हे KattaNews.in चे पत्रकार असून महाराष्ट्रातील स्थानिक बातम्या, सामाजिक घडामोडी, सरकारी योजना, शेती, शिक्षण आणि राजकीय विषयांचे अचूक, विश्वासार्ह व वस्तुनिष्ठ वृत्तांकन करतात. तथ्य पडताळणी, संतुलित पत्रकारिता आणि वाचकांना उपयुक्त माहिती जलद पोहोचवणे यावर त्यांचा विशेष भर असतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

Leave a Comment