हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

चांडोळ यात्रेत हातात कुकरी घेऊन दहशत करणारा मद्यधुंद तरुण पोलिसांच्या ताब्यात

On: July 26, 2026 11:39 AM
Follow Us:
बुलढाणा धाड पोलीस स्टेशन हद्दीतील चांडोळ यात्रेत शस्त्रासह ताब्यात घेतलेला आरोपी

बुलढाणा | भागवत गायकवाड 

पोलीस स्टेशन धाड हद्दीतील चांडोळ गावात सुरू असलेल्या यात्रेत एका तरुणाने हातात धारदार शस्त्र घेऊन फिरत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. या प्रकाराची तात्काळ दखल घेत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.दिपक ऊर्फ दत्तात्रय उमेश चिचोले (वय २२, रा. धाड) असे या तरुणाचे नाव असून, शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास तो चांडोळ येथील यात्रेत उघड्यावर शस्त्र घेऊन फिरत होता. त्यामुळे यात्रेकरूंमध्ये एकच खळबळ उडाली आणि काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत आरोपीला रंगेहाथ पकडले. पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने मद्यप्राशन केल्याचेही उघड झाले.

या प्रकरणी पोलीस स्टेशन धाड येथे भारतीय शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा क्र. ३०३/२०२६ नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रवींद्र हजारे करत आहेत.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगून दहशत माजवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला आजच जॉईन करा

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

 

 

भागवत गायकवाड

भागवत गायकवाड हे KattaNews.in चे वार्ताहर असून बुलढाणा जिल्हा व महाराष्ट्रातील गुन्हेगारी, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, शेती आणि जनहिताच्या विषयांवर अचूक, विश्वासार्ह व वस्तुनिष्ठ मराठी वृत्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment