KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

दगडवाडीत खळबळ! पहाटे घराबाहेर आढळला शेतकऱ्याचा मृतदेह

On: July 26, 2026 8:38 AM
Follow Us:
दगडवाडी देऊळगाव राजा येथे शेतकरी नंदाजी घुगे मृतावस्थेत आढळल्याची घटनास्थळाची प्रतिमा

देऊळगाव राजा|राहुल नायर

देऊळगाव राजा तालुक्यातील दगडवाडी येथे एका शेतकऱ्याचा मृतदेह घराच्या मागील बोळीत आढळल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. नंदाजी दुर्योधन घुगे (वय ४७) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, शुक्रवारी सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

प्राथमिक अंदाजानुसार भिंतीवरून खाली पडल्याने डोके आणि मानेला गंभीर दुखापत झाल्याने नंदाजी घुगे यांचा मृत्यू झाला असावा. देऊळगाव राजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदाजी घुगे गुरुवारी रात्री नऊ वाजेपर्यंत घरातच होते. रात्रीचे जेवण झाल्यानंतर कुटुंबीय नेहमीप्रमाणे झोपी गेले. मात्र शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास शेजारी राहणारे योगेश शिवाजी घुगे यांना नंदाजी घराच्या मागील बोळीत पडलेले दिसले. ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ घुगे कुटुंबीयांना याची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय धावतच घटनास्थळी पोहोचले. मात्र नंदाजी यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने ‘११२’ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला. काही वेळातच पोलीस व वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळावरून पोलिसांनी नंदाजी घुगे यांना तातडीने देऊळगाव राजा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. नंदाजी यांचे जुळे बंधू सुभाष दुर्योधन घुगे यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली, त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

देऊळगाव राजा पोलीस ठाण्याने या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. घटनेमागील नेमके कारण आणि परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे दगडवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

📲 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट द्या
✅ आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा »

राहुल नायर

राहुल नायर हे KattaNews.in चे पत्रकार असून महाराष्ट्रातील स्थानिक बातम्या, सामाजिक घडामोडी, सरकारी योजना, शेती, शिक्षण आणि राजकीय विषयांचे अचूक, विश्वासार्ह व वस्तुनिष्ठ वृत्तांकन करतात. तथ्य पडताळणी, संतुलित पत्रकारिता आणि वाचकांना उपयुक्त माहिती जलद पोहोचवणे यावर त्यांचा विशेष भर असतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

बुलढाणा धम्म मेळाव्यात भाषण करताना ॲड. बाळासाहेब आंबेडकर

‘मतदानाची इज्जत करायला शिका!’ बुलढाण्यातील धम्म मेळाव्यात बाळासाहेब आंबेडकरांचा सरकारवर हल्लाबोल

शेंदुरजन येथे जलतारा प्रकल्प अभियानांतर्गत जलसंधारण मार्गदर्शन कार्यशाळ

दुष्काळावर मात करण्यासाठी मोठा पुढाकार! शेंदुरजन येथे ‘जलतारा प्रकल्पा’ची विशेष कार्यशाळा

लोणार तालुक्यातील गुंजखेड येथील शेतकरी दगडू नथ्थू आंभोरे

दीड एकरांत फक्त दोन पोती सोयाबीन; कर्जफेडीच्या चिंतेत ६५ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या, लोणार तालुक्यातील घटना

हिवरा साबळे आणि रत्नापूर पाझर तलावांवरील कारवाईत ११ मोटर पंप जप्त

दुष्काळात तलावांतील पाण्यावर कोणाचा डल्ला? प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; हिवरा साबळे, रत्नापूरमध्ये ११ मोटर पंप जप्त

शेगावमध्ये अवैध धंद्यांसाठी जागा मागणाऱ्या उपरोधिक अर्जाची बातमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट अर्ज! शेगावात चक्क दारू दुकानापासून वरली मटका अड्ड्यासाठी मागितली जागा

घाटबोरी वनपरिक्षेत्रातील कथित सागवान वृक्षतोड आणि अंकुश येवले यांच्या निलंबनाच्या प्रस्तावाबाबतची बातमी

घाटबोरी वनविभागात खळबळ! अंकुश येवले यांच्या निलंबनाचा प्रस्ताव अमरावतीला; लोणीगवळीतही वृक्षतोड

Leave a comment