KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

बुलढाणा | धाड पेट्रोल पंप चोरीचा अवघ्या काही दिवसांत उलगडा; आरोपी जेरबंद, ₹1.05 लाखांची संपूर्ण रक्कम जप्त

On: July 22, 2026 6:02 AM
Follow Us:
बुलढाणा जिल्ह्यातील धाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करडी फाटा येथील भोंडे पेट्रोल पंप चोरी प्रकरणाचा उलगडा करत आरोपीला अटक

बुलढाणा |भागवत गायकवाड 

धाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करडी फाटा येथील भोंडे पेट्रोल पंपावर झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत यशस्वी उलगडा केला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून चोरीस गेलेली ₹1 लाख 5 हजारांची संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली आहे. जलद तपास, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई करत गुन्ह्याचा छडा लावला.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशीष रोही यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू ठेवला.

या तपासात स्वप्नील नुदाराम वाघमारे (वय 19, रा. मरमोंढाळा, ता. जि. बुलढाणा) याला ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीदरम्यान त्याने चोरीची कबुली दिली. त्यानंतर आरोपीकडून चोरीस गेलेली ₹1,05,000 इतकी संपूर्ण रोकड जप्त करण्यात आली. त्यामुळे फिर्यादीचे मोठे आर्थिक नुकसान टळले.

ही घटना करडी फाटा येथील भोंडे पेट्रोल पंपावर घडली होती. फिर्यादी खंडू संतोषराव भोंडे (रा. म्हसला बु., ता. जि. बुलढाणा) यांच्या तक्रारीवरून धाड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 273/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या यशस्वी कारवाईत अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशीष रोही, PSI प्रताप बाजड तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास धाड पोलीस ठाणे करीत असून आरोपीकडून इतर गुन्ह्यांबाबतही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


📲 KattaNews.in WhatsApp ग्रुप जॉईन करा

बुलढाणासह महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज, सरकारी योजना, शेती, नोकरी, शिक्षण आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.


संबंधित बातम्या

भागवत गायकवाड

भागवत गायकवाड हे KattaNews.in चे वार्ताहर असून बुलढाणा जिल्हा व महाराष्ट्रातील गुन्हेगारी, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, शेती आणि जनहिताच्या विषयांवर अचूक, विश्वासार्ह व वस्तुनिष्ठ मराठी वृत्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

किनगाव राजा येथे संजीवनी दाभाडे मृत्यूप्रकरणी पतीला अटक

चारित्र्याच्या संशयातून संसाराचा शेवट? दोन दिवसांपूर्वी दिले होते भांडण न करण्याचे आश्वासन; किनगाव राजात २३ वर्षीय विवाहितेचा मृत्यू, पती अटकेत

मलकापुरात इस्टेट ब्रोकर राकेश तलरेजा यांच्यावर अॅसिड हल्ला

मलकापुरात इस्टेट ब्रोकरवर ॲसिड हल्ला; फोनवर बोलत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फेकले ॲसिड

गिरोली बुद्रुकसह ग्रामीण महिलांचे कर्जवसुली थांबविण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

दुष्काळातही कर्जवसुलीचा तगादा? गिरोली बुद्रुकसह ग्रामीण महिलांचे तहसीलदारांना निवेदन

मेरा बु. येथे ५६ वर्षीय आयटीआय शिक्षकाचा मृत्यू; घटनेमुळे कवठळ आणि मेरा बु. परिसरात शोककळा.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर! मेहकरमधील ५६ वर्षीय ITI शिक्षकाची आत्महत्या; मेरा बु. येथील शेतात मृतदेह आढळल्याने परिसरात शोककळा

सैलानी बाबा दर्गा परिसरात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याप्रकरणी रायपूर पोलिसांचे आवाहन

सैलानी बाबा दर्गा परिसरात अनोळखी महिलेचा मृतदेह; ओळख पटविण्यासाठी रायपूर पोलिसांचे आवाहन

देऊळगाव राजा येथे श्री बालाजी महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेले भाविक

३३४ वर्षांची परंपरा! देऊळगाव राजात बालाजींच्या पालखी सोहळ्याला भक्तांची मांदियाळी; ५२ थांब्यांवर दर्शन

Leave a comment