KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

चिखली पोलिसांची मोठी कारवाई! MPDA अंतर्गत सराईत गुन्हेगार 1 वर्षासाठी स्थानबद्ध, दोघांना 3 महिन्यांसाठी तडीपार

On: July 21, 2026 7:54 AM
Follow Us:
चिखली पोलिसांची मोठी कारवाई, MPDA अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध आणि दोघांना तडीपार

चिखली | विशाल गवई 

बुलढाणा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चिखली पोलिसांनी मोठी आणि कठोर कारवाई केली आहे. सराईत गुन्हेगार स्वप्निल उर्फ संपत गजानन काकफळे (वय 25) याच्यावर महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा (MPDA) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याला एका वर्षासाठी बुलढाणा जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. याशिवाय आणखी दोन जणांना तीन महिन्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांनी स्वप्निल काकफळे याच्याविरुद्धचा MPDA प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. प्रस्तावातील पुरावे आणि गुन्हेगारी स्वरूपाचा सखोल आढावा घेतल्यानंतर जिल्हा दंडाधिकारी यांनी त्याला एका वर्षासाठी बुलढाणा जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

पोलीस नोंदीनुसार स्वप्निल काकफळे याच्याविरुद्ध दुखापत करणे, जीवघेणा हल्ला, चोरी, रात्रीच्या वेळी संशयास्पदरीत्या फिरणे, सार्वजनिक शांतता भंग करणे, गांजा सेवन करणे, जुगाराशी संबंधित गुन्हे तसेच गर्दीचा फायदा घेऊन चोरीचा प्रयत्न करणे अशा गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमुळे चिखली शहर आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

याच कारवाईचा भाग म्हणून साहिल राजेंद्र शिंगणे आणि अनिकेत शाम श्रीमंत या दोघांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार दोघांना तीन महिन्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत पोलीस अंमलदार अमोल गवई, विजय किटे, अजय इटावा, राहुल पायघन, प्रशांत धंदर, ज्ञानेश्वर शिंदे तसेच संजय भुजबळ यांनी सक्रिय सहभाग घेतला.

चिखली पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, सराईत गुन्हेगार आणि समाजकंटकांविरुद्ध अशाच कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाया भविष्यातही सुरू राहतील. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आवश्यक ती प्रत्येक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

📢 आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, शेती, नोकरी, हवामान आणि स्थानिक घडामोडी सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

👉 व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 


संबंधित बातम्या

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

किनगाव राजा येथे संजीवनी दाभाडे मृत्यूप्रकरणी पतीला अटक

चारित्र्याच्या संशयातून संसाराचा शेवट? दोन दिवसांपूर्वी दिले होते भांडण न करण्याचे आश्वासन; किनगाव राजात २३ वर्षीय विवाहितेचा मृत्यू, पती अटकेत

मलकापुरात इस्टेट ब्रोकर राकेश तलरेजा यांच्यावर अॅसिड हल्ला

मलकापुरात इस्टेट ब्रोकरवर ॲसिड हल्ला; फोनवर बोलत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फेकले ॲसिड

गिरोली बुद्रुकसह ग्रामीण महिलांचे कर्जवसुली थांबविण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

दुष्काळातही कर्जवसुलीचा तगादा? गिरोली बुद्रुकसह ग्रामीण महिलांचे तहसीलदारांना निवेदन

मेरा बु. येथे ५६ वर्षीय आयटीआय शिक्षकाचा मृत्यू; घटनेमुळे कवठळ आणि मेरा बु. परिसरात शोककळा.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर! मेहकरमधील ५६ वर्षीय ITI शिक्षकाची आत्महत्या; मेरा बु. येथील शेतात मृतदेह आढळल्याने परिसरात शोककळा

सैलानी बाबा दर्गा परिसरात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याप्रकरणी रायपूर पोलिसांचे आवाहन

सैलानी बाबा दर्गा परिसरात अनोळखी महिलेचा मृतदेह; ओळख पटविण्यासाठी रायपूर पोलिसांचे आवाहन

देऊळगाव राजा येथे श्री बालाजी महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेले भाविक

३३४ वर्षांची परंपरा! देऊळगाव राजात बालाजींच्या पालखी सोहळ्याला भक्तांची मांदियाळी; ५२ थांब्यांवर दर्शन

Leave a comment