हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

₹25 हजारांची लाच घेताना पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप मोरे ACB च्या जाळ्यात; विकासकामांच्या बिलासाठी मागितले होते 3% कमिशन

On: July 16, 2026 12:01 PM
Follow Us:
₹25 हजारांची लाच घेताना पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप मोरे ACB च्या जाळ्यात

बुलडाणा | विशाल गवई 

विकासकामांच्या बिलाच्या मंजुरीसाठी 3 टक्के कमिशनच्या स्वरूपात ₹25 हजारांची लाच स्वीकारताना पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप उत्तमराव मोरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडल्याची घटना उघडकीस आली आहे. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर रचलेल्या सापळ्यात ही कारवाई करण्यात आली असून या घटनेमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

ACB च्या प्रसिद्धीपत्रकानुसार, संबंधित तक्रारदाराने 3 जुलै 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराने ग्रामपंचायतीअंतर्गत दोन नाली बांधकामे आणि एक पेव्हर ब्लॉक रस्त्याचे काम पूर्ण केले होते. या विकासकामांच्या बिलाची रक्कम मंजूर करून देण्यासाठी विस्तार अधिकारी संदीप मोरे यांनी बिलाच्या रकमेच्या 3 टक्के म्हणजेच ₹25 हजारांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत थेट ACB कडे धाव घेतली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तक्रारीची गोपनीय पडताळणी केली. पडताळणीदरम्यान लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ACB ने नियोजनबद्ध सापळा रचला.

ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने आरोपी अधिकाऱ्याला रक्कम दिल्यानंतर संदीप मोरे यांनी स्वतःच्या ताब्यात ₹25 हजारांची रक्कम स्वीकारल्याचे ACB ने म्हटले आहे. त्याचवेळी पथकाने त्यांना रंगेहात पकडले.

या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ACB ने दिली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक वापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राजेश राठोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र सखरे, पोलीस निरीक्षक श्यामलाल निरछे तसेच इतर अधिकाऱ्यांचा सहभाग होता.

दरम्यान, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन ACB ने केले आहे.

 

👉 KattaNews.in वर महाराष्ट्रातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, सरकारी योजना, कृषी, शिक्षण, रोजगार आणि जिल्हानिहाय महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी वाचा. आमचे WhatsApp व Telegram अपडेट्स नक्की जॉईन करा.

Related News

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी; शासनाचे नवे परिपत्रक

मोठी घोषणा! महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी; शासनाने काढले नवे परिपत्रक

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचे पोलीस शिपाई चंद्रनिलकांत सोनुने यांनी मुंबईतील 80 वर्षीय महिलेला मदत केल्यानंतर त्यांचा गौरव करण्यात आला.

मुंबईत 80 वर्षीय आजीला दिला आधार; चिखलीच्या पोलीस शिपाई चंद्रनिलकांत सोनुने यांच्या माणुसकीची सर्वत्र चर्चा

बुलढाण्यात एसटी स्थानकाच्या 200 मीटर परिसरात RTO आणि पोलिसांची वाहन जप्ती कारवाई

एसटी स्थानकाच्या 200 मीटरमध्ये वाहन लावलं? थेट जप्ती; बुलढाण्यात RTO-पोलिसांची धडक कारवाई, 270 वाहनांवर Action

सिंदखेडराजा येथे SIR प्रक्रियेच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे

SIR कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही; सिंदखेडराजात जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांचा कडक इशारा

देऊळगाव राजात SC आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात काढण्यात आलेला विराट जनआक्रोश मोर्चा

देऊळगाव राजात SC आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात विराट जनआक्रोश; हजारोंचा मोर्चा, सरकारसमोर ७ प्रमुख मागण्या

नांदुरा येथील पूर्णा नदीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पूर्णा नदीत पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू; नांदुर्यात शोककळा

Leave a Comment