हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

एसटी स्थानकाच्या 200 मीटरमध्ये वाहन लावलं? थेट जप्ती; बुलढाण्यात RTO-पोलिसांची धडक कारवाई, 270 वाहनांवर Action

On: July 15, 2026 7:57 AM
Follow Us:
बुलढाण्यात एसटी स्थानकाच्या 200 मीटर परिसरात RTO आणि पोलिसांची वाहन जप्ती कारवाई
बुलढाणा | विशाल गवई 
जिल्ह्यातील एसटी बस स्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे मोठी मोहीम हाती घेतली आहे. आता एसटी स्थानकाच्या 200 मीटर परिसरात प्रवासी उचलण्यासाठी किंवा वाहतूक करण्यासाठी खाजगी वाहन उभे आढळल्यास केवळ दंड नव्हे, तर संबंधित वाहन थेट जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेसह एसटी महामंडळाच्या उत्पन्नाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन क्लीन’ मोहिमेचा दुसरा टप्पा 1 जुलै ते 10 जुलैदरम्यान अधिक तीव्रतेने राबविण्यात आला. या कालावधीत जिल्हाभरात 270 खाजगी वाहनांवर कारवाई करण्यात आली असून एकूण 2 लाख 72 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

यापूर्वी 5 जून ते 15 जूनदरम्यान झालेल्या पहिल्या टप्प्यात 306 वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. त्या वेळी जवळपास 4 लाख रुपयांचा दंड वसूल झाला होता. सलग दोन टप्प्यांमध्ये झालेल्या कठोर कारवाईमुळे अवैध प्रवासी वाहतुकीवर मोठा आळा बसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

ही विशेष मोहीम परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. प्रियंका नारनौरे यांच्या निर्देशानुसार जिल्हा पोलीस आणि आरटीओ विभागाने संयुक्तरीत्या राबविली आहे. कारवाईदरम्यान एसटी स्थानक परिसरातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले.

प्रशासनाच्या या मोहिमेचा सर्वाधिक सकारात्मक परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर दिसून आला आहे. अधिकृत माहितीनुसार, अवैध वाहतुकीवर नियंत्रण आल्यामुळे बुलढाणा विभागाच्या एसटी उत्पन्नात तब्बल 74 लाख रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. यासोबतच एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.

आतापर्यंत अनेक खाजगी वाहने एसटी स्थानकाच्या परिसरात प्रवासी चढवणे-उतरणे, अवैध प्रवासी वाहतूक करणे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणे अशा प्रकारच्या नियमभंगात सहभागी असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत होती आणि एसटी महामंडळालाही आर्थिक फटका बसत होता.

यापुढे एसटी स्थानकाच्या 200 मीटर परिसरात कोणतेही खाजगी वाहन नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास संबंधित वाहनावर थेट जप्तीची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा आरटीओ आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनाने नागरिकांना शक्यतो अधिकृत एसटी सेवेचाच वापर करण्याचे आवाहन केले असून अवैध प्रवासी वाहतुकीची माहिती मिळाल्यास तत्काळ संबंधित विभागाला कळविण्याचेही सांगितले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातील विशेष मोहीम आगामी काळातही सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

📢 KattaNews.in वर अशाच महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी वाचा

बुलढाणा, महाराष्ट्र, सरकारी योजना, शेती, हवामान, शिक्षण, रोजगार, गुन्हेगारी आणि ब्रेकिंग न्यूजचे अचूक अपडेट्स मिळवण्यासाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या. ही बातमी आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.

संबंधित बातम्या

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

अंढेरा पोलिसांनी पकडलेले अवैध रेती वाहतूक करणारे दोन टिप्पर

अंढेरा पोलिसांची मोठी कारवाई! रेतीची अवैध वाहतूक करणारे २ टिप्पर पकडले; ८ ब्रास रेतीसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

चिखली-खामगाव मार्गावर बस आणि टिप्परची जोरदार धडक

चिखली-खामगाव मार्गावर भीषण अपघात! बस-टिप्परची जोरदार धडक; टिप्परचा चुराडा

चिखलीतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडे निवेदन देताना उपनगराध्यक्ष वैशालीताई खेडेकर

चिखलीत मुलींच्या छेडछाडीविरोधात उपनगराध्यक्षांचा पोलिसांना इशारा; “कारवाई करा, अन्यथा महिलांना घेऊन रस्त्यावर उतरू!”

MPSC पेपरफुटी प्रकरणात अवर सचिवासह 6 जणांना अटक

MPSC पेपरफुटीचा धक्कादायक भांडाफोड; अवर सचिवासह 6 जणांना अटक, प्रेमभंगातून फुटला पेपर

अंजनी खुर्द येथे ईद मिलाद निमित्त मदरशातील मुलांचा जुलूस

अंजनी खुर्दमध्ये ईद मिलादचा उत्साह; मदरशातील मुलांचा जुलूस अन् नात-कलिमाचे पठण

साखरखेर्डा येथे ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त रक्तदान करताना रक्तदाते

साखरखेर्डा येथे ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १४० जणांचे रक्तदान, हिंदू-मुस्लिम बांधवांनी जपली सामाजिक बांधिलकी

Leave a Comment