चिखली | प्रतिनिधी (विशाल गवई)
शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल, पाण्याचे डबके आणि खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अनेकांना चिखलातून वाट काढत किंवा अनवाणी शाळेत जावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यात रस्त्याची अवस्था अधिकच बिकट होत असल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्याबाबत ग्रामपंचायत तसेच संबंधित प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने अखेर गावातच शाळा भरवून प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
यावेळी पालक आणि ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की, विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित रस्ता तातडीने उपलब्ध करून दिला नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क अबाधित राहण्यासाठी संबंधित विभागाने रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या आंदोलनाची परिसरात चर्चा सुरू असून, संबंधित विभाग याकडे कितपत गांभीर्याने लक्ष देतो आणि रस्त्याच्या कामाला गती मिळते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
👉 वाचा अशाच महत्त्वाच्या स्थानिक बातम्या
- घरकुल योजनेतील कथित गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांमार्फत CEOंना निवेदन
- रखडलेल्या जलजीवन योजनेसाठी ग्रामस्थांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
- डॉ. राजेंद्र गोडे महाविद्यालयातील खत साठा प्रकरणात गुन्हा दाखल
📲 KattaNews.in ला फॉलो करा
बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात वेगवान बातम्यांसाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या. आपल्या परिसरातील बातम्या, फोटो आणि व्हिडिओ आमच्यापर्यंत पाठवा.










