हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

CBI अधिकारी बनून व्यापाऱ्याला लुटलं! 25 लाखांची रोख रक्कम अवघ्या 12 तासांत पोलिसांनी केली जप्त

On: June 22, 2026 11:36 AM
Follow Us:
CBI अधिकारी असल्याचे भासवून व्यापाऱ्याची 25 लाखांची लूट करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात
खामगाव|विशाल गवई CBI अधिकारी असल्याचे भासवून खामगाव येथील एका व्यापाऱ्याकडून लाखो रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 12 तासांत अटक करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत आरोपींकडून संपूर्ण 25 लाख रुपयांची रोख रक्कम, फिर्यादीचा मोबाईल फोन तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत.

बाळापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गंभीर गुन्ह्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. आरोपींनी स्वतःला CBI अधिकारी असल्याचे सांगून व्यापाऱ्याला धमकावले आणि त्याच्याकडील मोठी रक्कम बळजबरीने ताब्यात घेतली होती. घटनेनंतर पीडित व्यापाऱ्याने तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकात तीन अधिकारी आणि 20 कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

तपासादरम्यान खामगाव-बाळापूर मार्गावरील सुमारे 50 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे बारकाईने निरीक्षण करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण, डिजिटल पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. अवघ्या 12 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आरोपींची ओळख निश्चित करण्यात यश आले.

या प्रकरणात हार्दिक मनोजकुमार गुरबानी (वय 22, रा. सिंधी कॉलनी, खामगाव) आणि साहिल नंदकिशोर नय्थानी (वय 25, रा. बीएचआर नगर, खामगाव) यांना अटक करण्यात आली आहे. दोघांनाही खामगाव येथून ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यातील संपूर्ण 25 लाख रुपयांची रोख रक्कम, फिर्यादीचा मोबाईल फोन, दोन दुचाकी आणि इतर साहित्य असा एकूण 27.50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे पीडित व्यापाऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत.

दरम्यान, नागरिकांनी स्वतःला केंद्रीय तपास यंत्रणा, पोलीस किंवा सरकारी अधिकारी म्हणून ओळख सांगणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये आणि कोणतीही शंका आल्यास तातडीने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Related News


हे आवश्यक करा..

अशाच बुलढाणा, खामगाव, बाळापूर आणि महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह व सर्वात वेगवान बातम्यांसाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या. आपल्या मित्र-परिवारासोबत ही बातमी शेअर करा.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पालकमंत्री बेपत्ता, बुलढाण्यात शेतकऱ्यांची पोलिसांत तक्रार

पालकमंत्री बेपत्ता? ‘काजू-बदामाची व्यवस्था शेतकरी करतील, पण बांधावर तरी पाठवा’ बुलढाण्यात पोलिसांत तक्रार

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश रद्द राहुल गांधी फोन कॉल बुलढाणा काँग्रेस

राहुल गांधींच्या एका फोनने फिरलं बुलढाण्यातील राजकारण! राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश रद्द; मध्यरात्री समर्थकांचा घराबाहेर जल्लोष

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश, चिखलीचे माजी आमदार

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश: पक्षप्रवेशाच्या पूर्वसंध्येला राहुल गांधींचा फोन? चिखलीच्या राजकारणात चर्चांना उधाण

वडगाव तेजन रॉबरी: सरस्वती विद्यालय परिसरात महिलेची सोन्याची पोत ओरबाडली

शाळेच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याची पोत ओरबाडली; वडगाव तेजनमध्ये दिवसाढवळ्या रॉबरी

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

Leave a Comment