हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

चिखलीत वन विभाग ‘ॲक्शन मोड’मध्ये; मेरा बुद्रुकमध्ये लाखोंचा अवैध लाकूड साठा जप्त

On: May 30, 2026 9:04 AM
Follow Us:
चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक येथे वन विभागाने जप्त केलेला अवैध लाकूड साठा

चिखली |सुनिल अंभोरे 

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात वन विभागाने मोठी धडक कारवाई करत मेरा बुद्रुक परिसरातून तब्बल दोन लाख रुपये किमतीचा अवैध लाकूड साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, वन विभाग आता पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’मध्ये आल्याचे चित्र दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २८ मे २०२६ रोजी वन विभागाला मेरा बुद्रुक शिवारात विनापरवाना निम आणि इतर अडजात प्रजातींच्या लाकडाचा मोठा साठा लपवून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीची खात्री करून वन विभागाच्या पथकाने परिसरात अचानक छापा टाकला.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

उपवनसंरक्षक बुलढाणा श्री. जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कारवाईत सुमारे दोन लाख रुपये बाजारमूल्य असलेला लाकूड साठा जप्त करण्यात आला. अंचरवाडी बिटचे वनरक्षक गजानन माणिकराव पोटे यांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण कारवाई केली.

छाप्यादरम्यान कोणत्याही प्रकारचा वैध परवाना नसताना साठवून ठेवलेले मौल्यवान लाकूड वन विभागाच्या ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू असून, तपास अधिक वेगाने करण्यात येत असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मेरा बुद्रुक परिसरात होत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर वन विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाची चक्रे गतिमान केली होती.

या कारवाईत वनरक्षक गजानन माणिकराव पोटे, वनसेवक ऋषिकेश तुपकर यांनी सहभाग घेतला. तसेच सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व कॅम्पा बुलढाणा श्री. वैभव काकडे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रकरणाचा तपास वनपाल प्रदीप प्रकाश मुंढे हे करत आहेत.

“पर्यावरणाचा ऱ्हास करणारी आणि विनापरवाना वृक्षतोड करणारी कोणतीही टोळी असो, त्यांची गय केली जाणार नाही. मेरा बुद्रुक येथील कारवाई ही केवळ सुरुवात असून, मुख्य आरोपींपर्यंत वन विभाग लवकरच पोहोचेल,” असा इशारा उपवनसंरक्षक श्री. जमीर शेख यांनी दिला.


हे पण वाचा..


हे आवश्यक करा…

आपल्या परिसरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष अपडेट्ससाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या. आपल्या भागातील बातमी किंवा माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.

सुनिल अंभोरे

सुनिल अंभोरे हे आपल्या न्यूज नेटवर्कचे विश्वासार्ह आणि सक्रिय वार्ताहर असून ग्रामीण, सामाजिक, प्रशासकीय तसेच जनहिताच्या विषयांवर सातत्याने लेखन करतात. स्थानिक पातळीवरील घडामोडी अचूक, निष्पक्ष आणि तथ्यांच्या आधारे वाचकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकरी प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, प्रशासनाची कार्यपद्धती तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना आवाज देणारी पत्रकारिता करण्यावर त्यांचा भर आहे. बातमी लेखनात पारदर्शकता, विश्वसनीय स्रोत आणि जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणे ही त्यांची ओळख आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

सिंदखेडराजा येथे SIR प्रक्रियेच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे

SIR कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही; सिंदखेडराजात जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांचा कडक इशारा

देऊळगाव राजात SC आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात काढण्यात आलेला विराट जनआक्रोश मोर्चा

देऊळगाव राजात SC आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात विराट जनआक्रोश; हजारोंचा मोर्चा, सरकारसमोर ७ प्रमुख मागण्या

नांदुरा येथील पूर्णा नदीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पूर्णा नदीत पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू; नांदुर्यात शोककळा

साखरखेर्डा गट क्रमांक 870 जमीन प्रकरणात क्रीडांगणाची पाहणी करताना माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

साखरखेर्डा गट नं. 870 जमीन प्रकरण गाजले; बनावट फेरफार, भूमाफियांचा डाव? महसूल कलम 155 अंतर्गत कारवाईची मागणी

देऊळगाव राजा येथे पंढरपूरकडे जाणाऱ्या पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान व अन्नदान करताना

देऊळगाव राजात सेवाभावाचा आदर्श! पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान, अन्नदानाने जिंकली मने

साखरखेर्डा येथील बंद असलेला पशुवैद्यकीय दवाखाना

साखरखेर्ड्यात ना डॉक्टर, ना कर्मचारी; पशुवैद्यकीय दवाखाना कायम बंद, २५ गावांतील पशुपालक अडचणीत

Leave a Comment