हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

“पिकविमा रखडला तर थेट ताबा!” संभाजी ब्रिगेडचा बुलढाण्यात मोठा इशारा

Follow Us:
बुलढाणा पिक विमा आंदोलन संभाजी ब्रिगेड शेतकरी संताप

बुलढाणा | प्रा.दिलीप‌ नाईकवाड

जिल्ह्यातील हजारो शेतकरी आजही पिकविम्याच्या पैशांची वाट पाहत असताना संतापाचा उद्रेक झाला आहे. 2023-24 खरीप व रब्बी हंगामासह 2024-25 रब्बी हंगामातील कांदा पिकाचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले, मात्र अनेक शेतकऱ्यांना अजूनही विमा मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत मोठा इशारा दिला आहे.

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात धडक देत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारींची संपूर्ण यादी आणि वितरित विम्याची माहिती मागवली. वारंवार विचारणा करूनही विमा कंपनीकडून टोलवाटोलवी होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.विशेष म्हणजे, 2024-25 रब्बी हंगामातील कांदा पिकासाठी अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदवल्या होत्या. कंपनीकडून सर्वेक्षण होऊनही अद्याप पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

पांडुरंग पाटील यांनी स्पष्ट इशारा देताना सांगितले की, “लवकरात लवकर विमा रक्कम न मिळाल्यास जिल्हाभरातील सर्व विमा कार्यालये शेतकऱ्यांसह ताब्यात घेण्यात येतील.” या वक्तव्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

याआधी देखील प्रलंबित मागण्यांसाठी पाटील यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान आंदोलन करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही प्रश्न सुटले नसल्याने यावेळी आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत देण्यात आले.

दरम्यान, येत्या पालकमंत्र्यांच्या जिल्हा दौऱ्यात हा मुद्दा उपस्थित केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली. यामुळे आगामी काळात हा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

या आंदोलनात वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे तालुका अध्यक्ष गोपाल गरड, राहुल मेहत्रे तसेच संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

👉 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या Kattanews.in ला भेट देत रहा.

 

प्रा. दिलीप नाईकवाड

प्रा. दिलीप नाईकवाड हे Katta News साठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून बातम्या देतात. ते राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैचारिक विषयांवर वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक लेखन करतात. ते मागील 15+ वर्षांपासून शिक्षण व वैचारिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

Leave a Comment