हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

रक्षकच भक्षक! पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला; बुलढाण्यात खाकीची अब्रू धुळीस

On: April 9, 2026 9:28 PM
Follow Us:
बुलढाणा मध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याचे दृश्य

बुलढाणा क्राइम न्यूज |९ एप्रिल २०२६

पोलीसावर हल्ला, खाकीवर हल्ला आणि सरकारी कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला या धक्कादायक घटनेने बुलढाणा जिल्हा हादरला आहे. गुप्तधनाच्या अफवेतून सुरू झालेल्या या प्रकाराने आता गंभीर वळण घेतले असून पोलीस दलाची प्रतिमा धुळीस मिळाल्याची चर्चा आहे.

तामगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कवठळ शेत शिवारात ही थरारक घटना घडली. ५ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री रात्रगस्तीदरम्यान पोलीस अंमलदार संतोष तुळशीराम आखरे (वय ५१) आणि त्यांचे सहकारी प्रमोद मुळे गस्त घालत होते.

याच वेळी गुप्तधन काढण्याचा विधी सुरू असल्याची माहिती मिळाल्याने ते घटनास्थळी गेले. मात्र, तेथे कोणताही प्रकार आढळला नाही. परत येताना त्यांना दोन संशयित व्यक्ती दिसल्या.

“एवढ्या रात्री तुम्ही इथे काय करत आहात?” असा साधा प्रश्न विचारताच आरोपी राजेश गव्हाळे आणि मनोज गव्हाळे यांनी संतोष आखरे यांच्यावर संताप व्यक्त केला. त्यांनी शिवीगाळ करत अचानक हल्ला चढवला.

हातातील स्टीलच्या कड्याने आखरे यांच्या पाठीवर आणि कपाळावर जोरदार वार करण्यात आले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि रक्तबंबाळ अवस्थेत कोसळले. सहकारी प्रमोद मुळे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही धमक्या देण्यात आल्या.

या प्रकरणी संतोष आखरे यांच्या तक्रारीवरून तामगाव पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार पंडितराव सोनवणे करत आहेत.

या घटनेमुळे पोलीस दलातच असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून “रक्षकच भक्षक” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.


📌 Related News


👉 तुमची प्रतिक्रिया द्या

अशा घटनांवर तुमचे मत काय? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ब्रेकिंग न्यूजसाठी Kattanews.in ला भेट देत रहा.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

नेतनसा प्रकल्पातून शेतीसाठी पाणी उपसा बंद करण्याचे पाटबंधारे विभागाचे आदेश

नेतनसा प्रकल्पातून शेतीसाठी पाणी उपसा तात्काळ बंद; पाटबंधारे विभागाचा आदेश, पंप-मोटारी जप्त करण्याचा इशारा

देऊळगाव राजा दुहेरी हत्याकांड प्रकरणातील पोलीस कारवाई

देऊळगाव राजा दुहेरी हत्याकांडाला नवे वळण; दोन FIR, दोन मृत्यू अन् सर्व आरोपींना 9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

बुलढाण्यात खामगाव रोडवरील रॉयल एनफिल्ड गोडाऊनला लागलेली आग

बुलढाण्यात रॉयल एनफिल्ड गोडाऊनला भीषण आग; बुलेटसह स्पेअर पार्ट्स जळाले, १५ लाखांच्या नुकसानीचा अंदाज

लोणार तहसील कार्यालयात रेशन कार्डच्या नाव कमी करण्यासाठी शुल्क आकारल्याचा आरोप

लोणार तहसीलमध्ये रेशन कार्डमधून नाव कमी करण्यासाठी १०० रुपये? शासन शुल्क १० रुपये असल्याचा दावा; चौकशीची मागणी

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार संजुभाऊ गायकवाड यांची भेट

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार संजुभाऊ गायकवाड यांची सस्नेह भेट; शेतकरी प्रश्नांवर चर्चा

अंत्री खेडेकर येथे शेतमजुरावर बिबट्याचा हल्ला

शेतात पाणी काढताना बिबट्याचा शेतमजुरावर अचानक हल्ला; जीव वाचवण्यासाठी विहिरीत उडी

Leave a comment