हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

5 तास एसटी बस थांबली… कारण ऐकून थक्क व्हाल! साखरखेर्ड्यात प्रवाशांची प्रचंड गैरसोय

On: April 8, 2026 12:52 PM
Follow Us:
साखरखेर्डा बस स्थानकात 5 तास उभी असलेली एसटी बस, चालक आजारी पडल्याने प्रवाशांची गैरसोय

साखरखेर्डा |८ मार्च २०२६

मोठी बातमी समोर आली आहे. एसटी बस 5 तास उभी राहिली, चालक अचानक आजारी पडल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय, संताप आणि गोंधळ निर्माण झाला. मेहकर-साखरखेर्डा-पुणे मार्गावरील एमएच ४० व्ही ५७५१ क्रमांकाची बस सकाळी ७ वाजता स्थानकात पोहोचली. त्यावेळी चालक एस. एस. निकम यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांनी तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली, मात्र पर्यायी चालक उशिरा पाठवण्यात आल्याने बस स्थानकावरच थांबली.

प्रवाशांना तब्बल ५ तास प्रतीक्षा करावी लागली. काही प्रवासी कामानिमित्त पुण्याकडे निघाले होते, तर काहींना तातडीचे काम होते. दीर्घ प्रतीक्षेमुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, चालकाला तत्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. सकाळी ११ वाजता पर्यायी चालक आल्यानंतर बस पुण्याकडे रवाना झाली.

या घटनेमुळे मेहकर आगाराच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. चालकाने आधीच तब्येत ठीक नसल्याची माहिती दिल्याची चर्चा असूनही त्याला ड्युटी देण्यात आल्याचा मुद्दा समोर येत आहे.

प्रवाशांनी प्रशासनाने अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.


Related News


हे आवश्यक करा

ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या. ही बातमी शेअर करा आणि आपल्या परिसरातील समस्या आम्हाला कळवा.

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

भानगुरा जिल्हा परिषद शाळेत महिला शिक्षिकेची मागणी

महिला शिक्षिकेची मागणी; भानगुरा शाळेत शिक्षकपदाचा प्रश्न ऐरणीवर, दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे बंद

नेतनसा प्रकल्पातून शेतीसाठी पाणी उपसा बंद करण्याचे पाटबंधारे विभागाचे आदेश

नेतनसा प्रकल्पातून शेतीसाठी पाणी उपसा तात्काळ बंद; पाटबंधारे विभागाचा आदेश, पंप-मोटारी जप्त करण्याचा इशारा

देऊळगाव राजा दुहेरी हत्याकांड प्रकरणातील पोलीस कारवाई

देऊळगाव राजा दुहेरी हत्याकांडाला नवे वळण; दोन FIR, दोन मृत्यू अन् सर्व आरोपींना 9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

बुलढाण्यात खामगाव रोडवरील रॉयल एनफिल्ड गोडाऊनला लागलेली आग

बुलढाण्यात रॉयल एनफिल्ड गोडाऊनला भीषण आग; बुलेटसह स्पेअर पार्ट्स जळाले, १५ लाखांच्या नुकसानीचा अंदाज

लोणार तहसील कार्यालयात रेशन कार्डच्या नाव कमी करण्यासाठी शुल्क आकारल्याचा आरोप

लोणार तहसीलमध्ये रेशन कार्डमधून नाव कमी करण्यासाठी १०० रुपये? शासन शुल्क १० रुपये असल्याचा दावा; चौकशीची मागणी

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार संजुभाऊ गायकवाड यांची भेट

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार संजुभाऊ गायकवाड यांची सस्नेह भेट; शेतकरी प्रश्नांवर चर्चा

Leave a comment