KattaNews नवीन जाहिरात KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

पोलिस ठाण्यातच PSI वर हल्ला; कॉलर पकडून मारहाण, कॉन्स्टेबल जखमी

On: April 5, 2026 5:43 PM
Follow Us:
बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात PSI वर हल्ला

बुलढाणा | ५ एप्रिल २०२६

KattaNews जाहिरात 1

बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असताना पोलिस उपनिरीक्षकावर हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. PSI वर हल्ला, पोलिस ठाण्यात मारहाण आणि कॉन्स्टेबल जखमी अशी ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

KattaNews जाहिरात 2

२ एप्रिल रोजी दुपारी कर्तव्यावर असलेल्या पोलिस उपनिरीक्षक शशिकांत धारकरी यांच्यावर अक्षय सुधाकर कांबळे (वय २८, रा. जुनागाव) याने अचानक हल्ला केल्याचा आरोप आहे. आरोपी पत्नीसमवेत पोलिस ठाण्यात आला होता.

KattaNews जाहिरात 3

पत्नीला मारहाण करत असल्याचे दिसल्याने पोलिसांनी त्याला समज देत कायदेशीर मार्गाने तक्रार करण्यास सांगितले. मात्र यावरून संतप्त झालेल्या आरोपीने पोलिस ठाण्यातच शिवीगाळ सुरू केली.

KattaNews जाहिरात 4

परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने PSI धारकरी यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली. यावेळी त्याने जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, पोलिस कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. हस्तक्षेप करताना पोलिस कॉन्स्टेबल राम मुंडे यांच्या हाताला दुखापत झाली.

आरोपीने पोलिस ठाण्यातील स्टेशन डायरी व कागदपत्रांची फेकाफेक करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक युवराज रबडे करत आहेत.

👉 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट द्या

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

खडकपूर्णा प्रकल्पातील शेतीच्या मोटारी बंद करण्याच्या प्रयत्नाला विरोध करणारे शेतकरी

आधी अवैध रेती उपसा बंद करा, मगच मोटारी बंद करा! खडकपूर्णा प्रकल्पावर शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना इशारा

अमडापूर शिवारात गोठ्यात सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग निदान प्रकरणात तीन जिल्ह्यांच्या पीसीपीएनडीटी पथकाची संयुक्त कारवाई

अमडापुरात गोठ्यात सुरू होता अवैध गर्भलिंग निदानाचा प्रकार! तीन जिल्ह्यांच्या पथकाची संयुक्त कारवाई; पिता-पुत्रासह तिघांना अटक

घाटबोरी येथे चोरीला गेलेले सोयाबीनचे कट्टे

घाटबोरीत शेतकऱ्याला मोठा फटका! गोडाउनबाहेरचे १६ कट्टे सोयाबीन चोरीला

साखरखेर्डा येथील गायखेडी तलावातून अवैध पाणी उपशावर कारवाई करताना महसूल अधिकारी

साखरखेर्ड्यात महसूल विभागाची धडक कारवाई; गायखेडी तलावातून पाणी उपसा करणारे १० मोटारपंप जप्त

चिखली नगरपरिषदेच्या प्रस्तावित बॉम्बे मार्केट BOT प्रकल्पाशी संबंधित बाजारपेठ

पाच मिनिटांत २१ विषय मंजूर? चिखली नगरपरिषदेच्या सभेवर विरोधकांचे गंभीर आक्षेप

साखरखेर्डा परिसरातील पाझर तलाव आणि वन्यजीवांसाठी पाणीसाठ्याचा प्रश्न

साखरखेर्डा परिसरात पाझर तलावांचा पाणीसाठा धोक्यात! वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती, उपसा मात्र सुरूच

Leave a comment