हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत बंड! ९ पैकी ८ सदस्यांचा सरपंचांविरोधात अविश्वास प्रस्ताव

On: March 25, 2026 1:57 PM
Follow Us:
खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत ८ सदस्यांचा सरपंचांविरोधात अविश्वास प्रस्ताव
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

सिंदखेडराजा / २५ मार्च २०२६

सिंदखेडराजा तालुक्यातील  खैरव-बारलिंगा ग्रामपंचायत येथे मोठी राजकीय खळबळ उडाली असून अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्याने गावातील वातावरण तापले आहे. ९ पैकी तब्बल ८ सदस्यांनी एकत्र येत सरपंचांविरोधात बंड पुकारले असून थेट तहसीलदारांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.सरपंच सौ. नलिता राजेंद्र गरुड यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत सदस्यांनी गंभीर आरोप केले आहेत. ग्रामपंचायत कारभारात पारदर्शकता नसणे, सदस्यांना विश्वासात न घेणे आणि विकासकामे ठप्प झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

या अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी करणाऱ्या सदस्यांमध्ये विद्या संजय लहाने, प्रकाश रामभाऊ गरुड, नंदा श्रीकृष्ण तळेकर, दत्तू त्र्यंबक तळेकर, अलका सुधाकर नागरे, जनार्धन विक्रम नागरे, मीनाक्षी विनोद म्हस्के आणि सुनिता सुरेश भालेराव यांचा समावेश आहे.

याशिवाय सरपंच पतीकडून कारभारात कथित हस्तक्षेप, सदस्यांशी समन्वयाचा अभाव आणि विकासकामांमध्ये अनियमितता यांसारख्या मुद्द्यांवरही सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ३५ अंतर्गत हा प्रस्ताव दाखल करण्यात आला असून, विशेष सभा बोलावून मतदानाद्वारे अंतिम निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढील काही दिवसांत ग्रामपंचायतीतील सत्तासमीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

👉 अशाच ब्रेकिंग न्यूजसाठी KattaNews.in ला भेट द्या

तुमच्या भागातील ताज्या घडामोडी, राजकीय अपडेट्स आणि वायरल बातम्या मिळवा सर्वात आधी!

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment