हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

महावितरणच्या निष्काळजीपणाचा फटका! वरोडी येथे विधवा शेतकरी महिलेचा १ एकर गहू जळून खाक

On: March 16, 2026 6:00 PM
Follow Us:
सिंदखेडराजा तालुक्यातील वरोडी येथे महावितरणच्या वीज लाईनमुळे १ एकर गव्हाचे पीक जळून खाक

वरोडी (ता. सिंदखेडराजा) |१६ मार्च २०२६

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील वरोडी येथे महावितरणच्या वीज लाईनमुळे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे एका शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. वरोडी गावाजवळील शेतात लागलेल्या आगीत विधवा शेतकरी दुर्गाबाई संतोष गारोळे यांच्या १ एकर गव्हाचे पीक पूर्णपणे जळून खाक झाले. अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरातील शेतकरी वर्गात चिंता व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरोडी गावाच्या पश्चिम बाजूला दुर्गाबाई संतोष गारोळे यांचे “पांढरी” नावाचे सुमारे एक एकर शेत आहे. या शेतातून महावितरणची तीन फेज वीज लाईन गेलेली आहे. आज दुपारी सुमारे ३ वाजताच्या दरम्यान या वीज लाईनमधून ठिणगी पडून शॉर्टसर्किट झाल्याची घटना घडली.

या ठिणगीमुळे शेतातील उभ्या गव्हाच्या पिकाला अचानक आग लागली. काही क्षणातच आग वेगाने पसरत गेली आणि पूर्ण एक एकरातील गहू जळून खाक झाला. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत संपूर्ण पीक आगीत भस्मसात झाले होते.

दुर्गाबाई संतोष गारोळे या विधवा महिला असून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मुख्यतः शेतीवर अवलंबून आहे. गव्हाचे पीक जळून गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे.

हे पण वाचा..

Maharashtra Weather Alert : 17 ते 20 मार्च राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; शेतकऱ्यांना पंजाबराव डख यांचा इशारा

या घटनेची तात्काळ दखल घेऊन संबंधित प्रशासनाने पंचनामा करावा तसेच नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.


Related News :

हे आवश्यक करा 

अशाच स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.

 

समाधान वानखेडे

२५ वर्षांच्या प्रदीर्घ पत्रकारितेच्या अनुभवासह समाधान वानखेडे ग्रामीण वास्तव, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी प्रकरणे आणि सामाजिक प्रश्नांवर अचूक, संतुलित व जबाबदार पत्रकारिता करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजा येथील श्री व्यंकटेश महाविद्यालयातील विद्यार्थी दीक्षारंभ कार्यक्रम

देऊळगाव राजा : श्री व्यंकटेश महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न

चिखली तहसील कार्यालयात रेशन कार्ड ऑनलाइन करण्यासाठी ₹100 घेतल्याची तक्रार

चिखलीत रेशन कार्ड ऑनलाइन करण्यासाठी ₹100? तहसील कार्यालयातील तक्रारीने खळबळ; चौकशीची मागणी

सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील SIR मतदार पडताळणी अभियान

Sindkhed Raja News: 3 लाख 11 हजार मतदारांची पडताळणी पूर्ण; मृत, स्थलांतरित आणि दुबार मतदारांचा आकडा समोर

चिखली तहसील कार्यालयासमोर निकृष्ट रेशनचा तांदूळ ओतताना नागरिक

“या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी बायका-पोरांसोबत खावी!” चिखलीत संतप्त नागरिकांनी तहसील कार्यालयासमोरच ओतला रेशनचा तांदूळ

साखरखेर्डा येथे कावड यात्रा आणि ईद मिलाद शांततेत साजरे करण्याचे पोलिसांचे आवाहन

कावड यात्रा आणि ईद मिलाद शांततेत साजरे करा; साखरखेर्डा येथे पोलीस अधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन

Buldhana News जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचा विजय

Buldhana News: बुलढाणा जिल्हा बँक निवडणुकीत ‘सहकार’चा चौकार! ७ पैकी ५ जागा जिंकल्या; डॉ. राजेंद्र शिंगणे ठरले किंगमेकर?

Leave a Comment