वनविभागात निघाली १२ हजार वनमजूर पर्मनंट पद भरती ! पात्रता 4 थी पास.

वनमजूर

 

 

वनविभागात १२ हजार वनमजूर forest worker पर्मनंट पद भरती ! वनमजूर है वन विभागातील महत्त्वाचा घटक आहेत. परंतु, काळानुसार निवृत्त झाल्यामुळे वनमजुरांची संख्या कमी झाली असून, राज्यात १२ हजार पर्मनंट वनमजुरांची भरती करण्यात येणार आहे. हे वनमजूर forest worker स्थानिक रहिवासी असतील. त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच पदोन्नती आणि थेट भरती प्रक्रियेतून २८९ सहायक वनसंरक्षकांची पदे भरण्यात येतील, अशी माहिती नवनियुक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वन बल प्रमुख ‘शोमिता बिश्वास’ यांनी दिली.

 

 

 

शोमिता बिश्वास यांनी नुकताच महाराष्ट्र राज्याच्या प्रधान मुख्चा वनसंरक्षक forest guard तथा वन बल प्रमुख पदभार स्वीकारल्यानंतर  त्या म्हणाल्या, जंगलात बीट गार्डसोबत फिरणारे वनमजूर forest worker हा वन विभागातील महत्त्वाचा घटक आहेत. परंतु, निवृत्त झाल्यामुळे वन विभागात वनमजुरांची forest worker संख्या कमी झाली आहे. तात्पुरत्या स्वरूपात कामावर घेतलेल्या वनमजुरांच्या मदतीने काम पाहण्यात येत आहे. त्यामुळे वन विभागात १२ हजार वनमजुरांची भरती करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

 

 

 

मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न

मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यावर आपला भर राहणार असल्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक forest guard तथा वन बल प्रमुख शोमिता बिश्वास यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात मानव-वन्यजीव संघर्षात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास २५ लाखांची मदत देण्यात येते. परंतु, हा मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करण्यावर आपला भर राहणार आहे. त्यासाठी ताडोबा येथील ‘एआय’ सिस्टीम संपूर्ण राज्यात लागू करण्याबाबत विचार सुरु आहे.

महिला कर्मचाऱ्यांना ‘हेल्दी ॲटमॉस्फिअर’

वन विभागात अनेक महिला कर्मचारी कार्यरत आहेत. यात काही महिला कार्यालयीन कर्तव्य बजावतात तर काही महिला कर्मचारी फिल्ड ड्यूटी करतात. या सर्व महिलांना काम करताना चांगले वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे शोमिता बिश्वास म्हणाल्या. त्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, सोयी- सुविधा कशा उपलब्ध करून देता येतील, यावर आपला फोकस राहणार असून, त्यासाठी वन विभागातील प्रत्येक घटकाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.