हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

चिखलीत गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; तहसीलदारांना घेराव, महिलांनी चुल पेटवून केला संतापाचा निषेध

On: March 14, 2026 9:09 AM
Follow Us:
Congress protest in Chikhli against LPG gas cylinder price hike women cooking on traditional stove
चिखली : घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात झालेल्या वाढीविरोधात चिखली शहरात काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. महिलांनी चुलीवर स्वयंपाक करून आणि गॅस सिलेंडरची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला. काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत दरवाढ तातडीने मागे घेण्याची मागणी केली.मोदी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात अचानक ६० रुपयांची वाढ करून सर्वसामान्य जनतेवर आर्थिक भार टाकल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. केंद्रात सत्तेत आल्यापासून अनेक वेळा गॅस दरवाढ करण्यात आल्यामुळे सामान्य कुटुंबांचे बजेट कोलमडले असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेसच्या काळात सुमारे ४०० रुपयांवर असलेला सिलेंडर आज ९०० रुपयांच्या घरात पोहोचल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे यांनी सरकारवर जोरदार टीका करत “एकीकडे महिलांना लाडकी बहिण म्हणायचे आणि दुसरीकडे गॅस दरवाढ करून त्यांच्या घरातील चूल विझवायची, हेच का मोदी सरकारचे अच्छे दिन?” असा सवाल उपस्थित केला. गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य महिलांवर पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ येत असल्याचे त्यांनी सांगितले.

गुरुवार १२ मार्च रोजी चिखली तालुका काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध केला. तहसीलदार निवेदन स्वीकारण्यासाठी कार्यालयाबाहेर न आल्याने काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी तहसीलदारांना घेराव घालत दरवाढ मागे घेण्याची मागणी केली.

या आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. महिलांनी चुलीवर स्वयंपाक करून सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला तर काही आंदोलनकर्त्यांनी प्रतीकात्मक निषेध म्हणून गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा काढली. “गॅस दरवाढ रद्द करा”, “महागाईचा झटका – लाडक्या बहिणींना फटका”, “मोदी सरकारचा निषेध असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

या आंदोलनात तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामभाऊ जाधव, माजी अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अंबादास वाघमारे, शहर अध्यक्ष जाकीर शेख, महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा सौ. संगिताताई गाडेकर, शहर अध्यक्षा सौ. विद्याताई देशमाने यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Related News


📢 वाचकांसाठी सूचना : बुलढाणा जिल्हा, चिखली आणि राज्यातील ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी Kattanews.in नियमित वाचा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

Leave a Comment