हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

“सापाला जीवदान देताना सर्पमित्राचा मृत्यू!” खामगावमध्ये मण्यारच्या दंशाने 33 वर्षीय युवकाचा अंत

On: March 10, 2026 8:53 AM
Follow Us:
खामगाव येथील सर्पमित्र मंगेश कांबळे यांचा मण्यार सापाच्या दंशाने मृत्यू

खामगाव | १० मार्च २०२६

खामगाव येथे पकडलेल्या विषारी सापाला जीवदान देण्याचा प्रयत्न करताना एका सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मंगेश कांबळे (वय 33) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून ही घटना 9 मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश कांबळे हे सर्पमित्र म्हणून परिसरात ओळखले जात होते. त्यांनी पकडलेल्या मण्यार जातीच्या विषारी सापाला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यासाठी नेले होते. मात्र सापाला सोडत असताना अचानक सापाने पलटवार करून त्यांना दंश केला.

सापाचे विष त्यांच्या शरीरात झपाट्याने पसरल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली. त्यांना तात्काळ खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिकच बिघडल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले.

दरम्यान अकोला येथे पोहोचण्यापूर्वीच मंगेश कांबळे यांची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेमुळे खामगाव परिसरासह त्यांच्या मूळ गावात शोककळा पसरली असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

वन्यजीव संरक्षणासाठी सापांना पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडण्याचे काम करणाऱ्या सर्पमित्रांच्या कार्याबद्दल नागरिकांमध्ये मोठा आदर असतो. अशाच कार्यात जीव गमावल्याने मंगेश कांबळे यांच्या निधनाबद्दल सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे.


📢 KattaNews वाचकांसाठी आवाहन

तुमच्या परिसरातील ताज्या घडामोडी, अपघात, सामाजिक किंवा राजकीय बातम्या आम्हाला पाठवा.

📲 WhatsApp वर बातमी पाठवा : Kattanews.in

तुमची बातमी लाखो वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करू.


🔴 संबंधित बातम्या

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

समृद्धी महामार्ग हॉटेल आग - दुसरबीड येथील रमावि हॉटेलमधून निघणारा धूर

समृद्धी महामार्गावर हॉटेलला दुसरबीडजवळ रमावि हॉटेलमध्ये अचानक आग; शॉर्टसर्किटमुळे धुराचे लोट, सुरक्षा बल-क्युआरव्ही पथक धावले

साखरखेर्डा येथे अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान करताना भाजपचे मान्यवर

साखरखेर्ड्यात अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा सन्मान; पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा उपक्रम

दहावी बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक २०२७ पाहताना महाराष्ट्रातील विद्यार्थी

दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर! पाहा, परीक्षा कधीपासून सुरू होणार

सिंदखेडराजा ग्रामपंचायत प्रशासक नियुक्ती ४३ गावांची यादी

सिंदखेडराजातील ४३ ग्रामपंचायतींवर पुन्हा प्रशासक! पाहा गावनिहाय नियुक्तीची संपूर्ण यादी

Leave a Comment