हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

धक्कादायक! शिक्षिका पत्नीचा अपघात नसून सुपारी देऊन खून; पतीसह दोघे अटकेत

On: March 9, 2026 7:04 AM
Follow Us:
Vrushali Gavande teacher murder case buldhana

बुलढाणा |९ मार्च २०२६

बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथे घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला आहे. कवठळ परिसरात २ मार्च रोजी झालेला अपघात समजला जाणारा प्रकार प्रत्यक्षात खुनाचा कट असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. मृतक शिक्षिका वृषाली प्रकाश गावंडे (वय ३७) यांच्या मृत्यूमागे त्यांच्या पतीचाच हात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणात पोलिसांनी पती प्रकाश अनंता गावंडे (रा. पातुर्डा) आणि मालवाहू वाहन चालक मनीष नारायण सिंग सूर्यवंशी यांना अटक केली आहे. तर सुपारी देण्यासाठी मध्यस्थी करणारा आरोपी मंगेश चौहूलकर याचा शोध पोलीस घेत आहेत.

मृतक वृषाली गावंडे या बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. पती प्रकाश गावंडे यांच्यासोबत त्यांचे कौटुंबिक वाद सुरू असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या संदर्भात त्यांनी संग्रामपूर पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळाची तक्रारही दिली होती.

३ मार्च रोजी घडलेल्या अपघातानंतर मृतक शिक्षिकेचा भाऊ सुमित डोसे यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलिसांनी तपासाची दिशा बदलत तपास अधिक वेगाने सुरू केला.

हे पण वाचा..

दारूड्या भावाच्या मित्राला “घरी जा” म्हटल्याने वाद; लहान भावाने चाकूने भोसकून मोठ्या भावाचा खून

तपासादरम्यान टाटा छोटा हत्ती मालवाहू वाहन (MH 28 BB 5753) ने वृषाली गावंडे यांच्या स्कूटरला (MH 28 AL 5815) मागून जोरदार धडक दिल्याचे समोर आले. हा अपघात नसून नियोजित कट असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

पोलिस तपासात असेही उघड झाले की पती प्रकाश गावंडे आणि त्याचा मित्र मंगेश चौहूलकर यांनी वाहन चालक मनीष सूर्यवंशी याला १ लाख रुपयांची सुपारी देऊन हा खून घडवून आणला.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १३४ व १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे पण वाचा..

आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा गेला… सुलतानपूरमध्ये 24 वर्षीय बेरोजगार युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

आरोपींना ७ मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेंडगे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

हे पण वाचा..

दिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला! बीबीमध्ये शिक्षकाच्या घरात चोर रंगेहात पकडला

अधिक ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

समृद्धी महामार्ग हॉटेल आग - दुसरबीड येथील रमावि हॉटेलमधून निघणारा धूर

समृद्धी महामार्गावर हॉटेलला दुसरबीडजवळ रमावि हॉटेलमध्ये अचानक आग; शॉर्टसर्किटमुळे धुराचे लोट, सुरक्षा बल-क्युआरव्ही पथक धावले

साखरखेर्डा येथे अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान करताना भाजपचे मान्यवर

साखरखेर्ड्यात अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा सन्मान; पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा उपक्रम

सिंदखेडराजा ग्रामपंचायत प्रशासक नियुक्ती ४३ गावांची यादी

सिंदखेडराजातील ४३ ग्रामपंचायतींवर पुन्हा प्रशासक! पाहा गावनिहाय नियुक्तीची संपूर्ण यादी

वाकोडी (मलकापूर) येथे भरदुपारी पोत हिसकावण्याचा प्रयत्न झालेले काजळे यांचे घर

भरदुपारी चाकूचा धाक दाखवून महिलेची पोत हिसकावण्याचा प्रयत्न; आरडाओरड होताच तरुण धावले अन् चोरट्याने पळ काढला!

Leave a Comment