हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

लोणार सरोवर धोक्यात? ८ दिवसांचे साखळी उपोषण अखेर मागे; आमदार सिद्धार्थ खरात यांचे मोठे आश्वासन

On: March 3, 2026 9:30 AM
Follow Us:
महाराष्ट्रातील लोणार सरोवरात वाढलेली पाणीपातळी आणि पाण्याजवळील कमळजा माता मंदिर परिसर

लोणार (बुलढाणा) |3 मार्च २०२६ :

जागतिक कीर्तीचे लोणार सरोवर सध्या वाढत्या पाणीपातळीमुळे गंभीर संकटात सापडले असून साखळी उपोषण लोणार येथील भाविकांनी तब्बल आठ दिवस सुरू ठेवले होते. कमळजा माता मंदिर परिसर पाण्यात जात असल्याचा धोका निर्माण झाल्याने तसेच जैवविविधतेवर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन छेडण्यात आले होते. अखेर आमदार सिद्धार्थ खरात यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवरातील वाढती पाणीपातळी ही पर्यावरणीय दृष्ट्या गंभीर बाब मानली जात आहे. सरोवरात जात असलेल्या गोड्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावावी, पुरातन मंदिरांचे संरक्षण करावे आणि मंदिराची एक चावी विश्वस्त मंडळाकडे द्यावी अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती. कमळजा मंदिर परिसराला संरक्षण भिंत उभारण्याची मागणीही यावेळी जोर धरत होती.या पार्श्वभूमीवर लोणार येथील जागरूक नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केले होते. आमदार सिद्धार्थ खरात यांनी उपोषणस्थळी भेट देत चालू विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्न शासन दरबारी ठोसपणे मांडला असल्याचे सांगितले. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे आणि प्रश्न लवकरच मार्गी लागेल या विश्वासावर आंदोलन मागे घेण्यात आले.

लोणार सरोवरातील जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचा इशारा पर्यावरण अभ्यासकांनी दिला आहे. मंदिरांच्या पायऱ्या आणि परिसरात पाणी साचल्यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांनी शांततामय मार्गाने आपली भूमिका मांडली.

उपोषणात सहभागी झालेल्या प्रमुख नागरिकांमध्ये वैभव कायंदे, गजानन मापारी, उमेश पडघाण, रवी भाऊ मापारी, बल्लू मोरे, देवांग संचेती, कैलास मिटकरी, समाधान आखाडे, यश आखाडे, माऊली मापारी, संदीप भाऊ शिंदे, अंकुश राजे तिजारे, अमोल धनेकर, सचिन नंदकिशोर मापारी, शुभम सरकटे, आंबादास मापारी, सागर मापारी, धनंजय मापारी, श्रीकृष्ण भाऊ दुतोंडे, पंकज भाऊ नागरे, अमोल भाऊ सरदार, गणेश संजय मापारी, अंकुश पोहेकर, सचिन शेडुते, अजय डुकळे, ऋषी भागवत मापारी, गौतम भाऊ गवळी, दत्ता मापारी, अमोल दादा पिंपळनेर, ज्ञानेश्वर घायाळ पाटील, कैलास आमले, शंकर ठाकूर यांचा समावेश होता.

हे पण वाचा..

चिखलीत मोटारसायकल चोरीचा मोठा पर्दाफाश! अवघ्या 7 दिवसांत आरोपी जेरबंद, Hero HF Deluxe जप्त

उपोषण सोडताना शिवसेना लोणार तालुका प्रमुख राजूभाऊ बुधवत, प्रा. गजानन खरात, तालुका समन्वयक तेजराव घायाळ, गजानन मोरे, विजय मोरे सर, श्रीकांत नागरे, प्रवीण सरदार, बादशाह खान, तानाजी मापारी, परमेश्वर दहातोंडे, स्वप्नील हाडे यांच्यासह शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

हे पण वाचा..

Buldhana Crime: १५ हजारांच्या लाचप्रकरणी अप्पर कोषागार अधिकारी रंगेहात अटक; तिघे ACB च्या जाळ्यात

लोणार सरोवराचे अस्तित्व टिकवण्यासाठी तातडीने वैज्ञानिक पातळीवर उपाययोजना होणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाकडून ठोस कृती आराखडा जाहीर होईल का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


👉 अशाच विश्वासार्ह आणि वेगवान स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या.

 

विनायक कुटे

विनायक कुटे हे कट्टा न्यूज (Kattanews.in) चे प्रतिनिधी असून सामाजिक, प्रशासकीय आणि जनहिताच्या विषयांवर सातत्याने वार्तांकन करतात. नियमभंग, नागरिकांच्या समस्या, सार्वजनिक हिताशी संबंधित प्रश्न आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणे, ही त्यांच्या पत्रकारितेची ओळख आहे. सत्य, अचूक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

समृद्धी महामार्ग हॉटेल आग - दुसरबीड येथील रमावि हॉटेलमधून निघणारा धूर

समृद्धी महामार्गावर हॉटेलला दुसरबीडजवळ रमावि हॉटेलमध्ये अचानक आग; शॉर्टसर्किटमुळे धुराचे लोट, सुरक्षा बल-क्युआरव्ही पथक धावले

साखरखेर्डा येथे अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान करताना भाजपचे मान्यवर

साखरखेर्ड्यात अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा सन्मान; पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा उपक्रम

सिंदखेडराजा ग्रामपंचायत प्रशासक नियुक्ती ४३ गावांची यादी

सिंदखेडराजातील ४३ ग्रामपंचायतींवर पुन्हा प्रशासक! पाहा गावनिहाय नियुक्तीची संपूर्ण यादी

वाकोडी (मलकापूर) येथे भरदुपारी पोत हिसकावण्याचा प्रयत्न झालेले काजळे यांचे घर

भरदुपारी चाकूचा धाक दाखवून महिलेची पोत हिसकावण्याचा प्रयत्न; आरडाओरड होताच तरुण धावले अन् चोरट्याने पळ काढला!

Leave a Comment