दिवाळी जाहिरात बुकिंग - KattaNews.in
📢 KattaNews.in जाहिरात सेवा
आपल्या व्यवसायाची जाहिरात आजच द्या!
लाखो लोकांपर्यंत पोहोचवा!
दुकाने • हॉस्पिटल • क्लासेस • हॉटेल • स्थानिक व्यवसाय
✅ जाहिरातीसाठी WhatsApp वर संपर्क करा
KattaNews.in
KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात सेवा
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

बेराळा फाटा ‘मृत्यूचा सापळा’? एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, पत्नी गंभीर

On: February 24, 2026 5:48 PM
Follow Us:
चिखली-जालना मार्गावरील बेराळा फाट्यावर एसटी बस अपघाताचे दृश्य

चिखली | (दि. २४ फेब्रुवारी २०२६) 

चिखली-जालना मार्गावरील बेराळा फाट्यावर आज सकाळी घडलेल्या भीषण अपघातात एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून हा मार्ग अपघातप्रवण असल्याची भीती नागरिकांत व्यक्त होत आहे.

केळवद येथील संजय पांडुरंग गायकवाड (वय ५८) व पत्नी शिला संजय गायकवाड (वय ५०) हे जांभोरा येथे देवदर्शनासाठी दुचाकीने जात होते. सकाळी सुमारे ९ वाजता बेराळा फाट्यावर रस्ता ओलांडत असताना जालण्याकडून येणाऱ्या भरधाव एसटी बस (क्रमांक MH-14 MH-0872, संभाजीनगर ते हिंगणघाट) ने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.या भीषण धडकेत संजय गायकवाड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी शिला गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली. स्थानिकांनी हा फाटा अत्यंत धोकादायक बनत असल्याची चिंता व्यक्त केली आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे येथे वाहतूक नियंत्रण, वेगमर्यादा अंमलबजावणी आणि चेतावणी फलक लावण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

या प्रकरणी बसचालकाविरुद्ध चिखली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार भुषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.


📌 संबंधित बातम्या


👉 तुमच्या परिसरातील बातमी आम्हाला पाठवा

स्थानिक घटना, समस्या किंवा बातम्या WhatsApp वर पाठवा. Kattanews तुमचा आवाज बनवेल.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

चिखलीतील तलाठी पियुष गायकवाड यांच्या आत्महत्येची बातमी

अवघ्या २६ व्या वर्षी जीवनप्रवास थांबला; चिखलीतील तरुण तलाठी पियुष गायकवाड यांची आत्महत्या

बुलढाणा जिल्हा परिषद लाचप्रकरण ACB कारवाई

बुलढाणा जिल्हा परिषदेत ACB ची धडक कारवाई; लाच मागितल्याच्या आरोपावरून तांदूळकर आणि खर्चे या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई

देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ आणि अंढेरा परिसरातील धरणांवरील पाणी उपशाच्या तपासणीची मागणी

देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ, अंढेरा परिसरातील धरणांवर पाणी उपशाचे नियंत्रण कोण ठेवणार? भरारी पथकाच्या तपासणीची मागणी

शिंदी सरकारी एफ-क्लास जमीन प्रकरणात तत्कालीन ग्रामसेवकाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

शिंदी सरकारी जमीन प्रकरणात मोठी घडामोड! तत्कालीन ग्रामसेवकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

देऊळगाव राजा बालाजी महाराज मंदिरात मंगळसूत्र चोरीची घटना

देऊळगाव राजा येथील बालाजी मंदिरात गर्दीचा फायदा घेत महिलेचे मंगळसूत्र लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

साखरखेर्डा महिलेवर हल्ला करणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडले

साखरखेर्ड्यात भरदिवसा महिलेच्या घरात घुसून गळा दाबण्याचा प्रयत्न; आरडाओरड ऐकून नागरिकांनी आरोपीला पकडले

Leave a comment