हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

साखरखेर्डात वीज थकबाकीदारांवर धडक कारवाई; ५५ ग्राहकांचा पुरवठा खंडित

Follow Us:
साखरखेर्डा येथे थकीत ग्राहकांची वीज तोडताना विज वितरण कर्मचारी

साखरखेर्डा (जि. बुलढाणा) |२२ फेब्रुवारी २०२६

थकीत वीज बिल न भरल्याने विज वितरण कंपनीने साखरखेर्डा येथे धडक वसुली मोहीम सुरू केली असून गावातील ५५ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. विज वितरण उपकार्यालयांतर्गत तब्बल ₹1 कोटी 91 लाख रुपये थकीत असल्याने ही कारवाई करण्यात आली.

ता. १८ फेब्रुवारी रोजी कनिष्ठ अभियंता रोहित पाटील व अधिकारी विलास सवडदकर यांच्या नेतृत्वाखाली मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत थकीत ग्राहकांकडून ₹2 लाख 50 हजार रुपये वसूल करण्यात आले.गेल्या वर्षभरात अनेक ग्राहकांनी वीज बिल न भरल्यामुळे कंपनीने थकीत ग्राहकांची वीज तोडण्याची कारवाई सुरू केली आहे. तसेच अवैध वीज जोडणी शोधून वायर जप्त करण्यात आली असून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.अभियंता रोहित पाटील यांनी थकीत ग्राहकांना आवाहन करताना सांगितले की, थकीत बिल तातडीने भरून वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ग्राहकांनी सहकार्य करावे. ही शोध व वसुली मोहीम २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

आजच्या मोहिमेत प्रशांत रिंढे, प्रशांत हिवाळे, विष्णू भोसले, रवी शेजूळ, शिवाजी जाधव, अरुण जैवळ यांच्यासह सुमारे २५ कर्मचारी सहभागी झाले होते. या कारवाईमुळे दिवसभर गावातील वीज पुरवठ्यावर परिणाम झाला.


⚡ नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना

  • थकीत वीज बिल त्वरित भरा
  • अवैध वीज जोडणी टाळा
  • दंडात्मक कारवाईपासून बचाव करा
  • नियमित बिल भरून सेवा सुरळीत ठेवा

📢 हे आवश्यक करा

स्थानिक बातम्या सर्वात आधी वाचण्यासाठी Kattanews.in ला भेट द्या. ही बातमी उपयुक्त वाटल्यास शेअर करा.


🔗 संबंधित बातम्या

प्रा. दिलीप नाईकवाड

प्रा. दिलीप नाईकवाड हे Katta News साठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून बातम्या देतात. ते राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैचारिक विषयांवर वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक लेखन करतात. ते मागील 15+ वर्षांपासून शिक्षण व वैचारिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

Leave a Comment