हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

अडोळी परिसरात रानडुकरांचा हैदोस! गहू पिक फस्त; शेतकरी उध्वस्त

Follow Us:
अडोळी गावात रानडुकरांनी गहू पिक उखडून फस्त केल्याचे दृश्य
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

वाशिम|३ फेब्रुवारी २०२६

वाशिम जिल्ह्यातील शेतकरी आधीच अस्मानी-सुलतानी संकटांनी हतबल झाला असताना, आता वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे त्याच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. अडोळी परिसरात रानडुकरांनी शेतात घुसखोरी करत उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.

अडोळी येथील शेतकरी गंगुबाई इढोळे यांच्या गट नंबर ४४० मधील जमिनीत पेरलेले गहू पिक रानडुकरांनी अक्षरशः उखडून खाल्ले आहे. मेहनतीने उगवलेले पीक काही तासांतच नष्ट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढत असून शासनाकडून त्वरित अर्थसहाय्य मिळावे, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. रानडुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी वन्यजीव विभाग व वन विभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

वनविभागाने तातडीने पंचनामा करून ७२ तासांच्या आत युद्धपातळीवर नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. सध्या आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांवर वन्य प्राण्यांचा असा हल्ला होत राहिल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

या गंभीर प्रकरणाकडे जिल्हा प्रशासनाने जातीने लक्ष देऊन त्वरित मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी गंगुबाई इढोळे यांनी प्रशासनाशी बोलताना केली आहे.


📢 Katta News वर अपडेट राहा

अशाच शेतकरी प्रश्नांच्या, ग्रामीण भागातील ज्वलंत बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.

हे पण वाचा.

शासनाला थकीत देयके निकाली काढायचे नाहीत का? शिक्षक-प्राध्यापकांचे पाच ते सहा वर्षांपासूनचे पैसे रखडले

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Mehkar Hotel Ekant police raid sex racket two women rescued

मेहकर बायपासवरील ‘हॉटेल एकांत’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात दोन महिलांची सुटका

मोहाडी शिवारात बिबट्याचा हल्ला, नीलगाई जखमी

मोहाडी शिवारात बिबट्याचा थरार! नीलगाईवर हल्ला; मादी बिबट्या व दोन पिल्लांचा वावर

Leave a Comment