हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

देर आये दुरुस्त आये! केनवड येथे आ. अमित झनक यांच्या निधीतून उभारलेले तलाठी भवन अखेर लोकांच्या सेवेत

Follow Us:
केनवड येथे आमदार अमित झनक यांच्या निधीतून उभारलेले तलाठी भवन

वाशिम|१ फेब्रुवारी २०२६

रिसोड तालुक्यातील केनवड ग्रामपंचायत अंतर्गत स्थानिक आमदार अमित झनक यांच्या १५ लाख रुपयांच्या निधीतून उभारलेले तलाठी भवन अखेर लोकांच्या सेवेत दाखल झाले आहे.

केनवड ग्रामपंचायत मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस उभारण्यात आलेले हे तलाठी भवन केनवडसह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या महसूलविषयक अडीअडचणी सोडवण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

या तलाठी भवनात मंडळ अधिकारी व तलाठी नियमितपणे उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या जमीन नोंदी, फेरफार, उत्पन्न दाखले, सातबारा, महसूल प्रकरणे यावर कार्यवाही करणार आहेत.

विशेष म्हणजे हे तलाठी भवन गेल्या २ ते ३ वर्षांपासून तयार असतानाही प्रत्यक्षात वापरात न आणल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी होती. तहसील कार्यालयाच्या स्पष्ट सूचनांनंतरही अधिकारी येथे का बसत नव्हते, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.

मात्र, “देर आये दुरुस्त आये” या म्हणीप्रमाणे अखेर संबंधित अधिकारी आपल्या दप्तऱ्यासह तलाठी भवनात बसू लागले असून त्यामुळे केनवड व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

आता यापुढे केनवड व संपूर्ण मंडळातील महसूल विभागाची सर्व कामे याच तलाठी भवनातून पार पडणार असल्याने शेतकऱ्यांचा वेळ, पैसा व त्रास वाचणार आहे.


📢 तुमच्या भागातील बातम्या आम्हाला पाठवा

आपल्या गावातील समस्या, घडामोडी किंवा यशोगाथा Kattanews.in वर प्रसिद्ध करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.


🔗 संबंधित बातम्या

 

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

समृद्धी महामार्ग हॉटेल आग - दुसरबीड येथील रमावि हॉटेलमधून निघणारा धूर

समृद्धी महामार्गावर हॉटेलला दुसरबीडजवळ रमावि हॉटेलमध्ये अचानक आग; शॉर्टसर्किटमुळे धुराचे लोट, सुरक्षा बल-क्युआरव्ही पथक धावले

साखरखेर्डा येथे अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान करताना भाजपचे मान्यवर

साखरखेर्ड्यात अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा सन्मान; पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा उपक्रम

दहावी बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक २०२७ पाहताना महाराष्ट्रातील विद्यार्थी

दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर! पाहा, परीक्षा कधीपासून सुरू होणार

सिंदखेडराजा ग्रामपंचायत प्रशासक नियुक्ती ४३ गावांची यादी

सिंदखेडराजातील ४३ ग्रामपंचायतींवर पुन्हा प्रशासक! पाहा गावनिहाय नियुक्तीची संपूर्ण यादी

Leave a Comment