हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

भोकरदनमध्ये शिकणाऱ्या मुली असुरक्षित? रोड रोमियोचा पाठलाग, दामीनी पथक स्थापनेची जोरदार मागणी

On: January 23, 2026 8:43 AM
Follow Us:
भोकरदन शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींच्या सुरक्षेसाठी दामीनी पथक स्थापनेची मागणी
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

भोकरदन | २३ जानेवारी २०२६

भोकरदन शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे.
Road Romeo च्या छेडछाडीच्या घटनांमुळे Girls Safety बाबत पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून
Damini Pathak स्थापनेची जोरदार मागणी पुढे येत आहे.
अलीकडे न्यू हायस्कूल भोकरदन येथे शिक्षणासाठी बाहेर गावाहून येणाऱ्या मुलींचा पाठलाग करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून,
या प्रकारामुळे भोकरदन पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, परवा बाहेर गावाहून न्यू हायस्कूल भोकरदन येथे शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींचा दोन तरुणांकडून पाठलाग करण्यात आला.
गावापासूनच हे तरुण आपला पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच संबंधित विद्यार्थिनीने प्रसंगावधान राखत
भोकरदन बसस्थानकावरून शाळेतील शिक्षकांशी संपर्क साधला.

शिक्षकांनी वेळेचे गांभीर्य ओळखत तात्काळ बसस्थानक गाठले.
काही प्रवाशांच्या मदतीने एका रोड रोमियोला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले,
तर दुसरा आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरला.

भोकरदन शहरात तालुक्यातील तसेच ग्रामीण भागातील अनेक मुली शिक्षणासाठी दररोज ये-जा करतात.
शाळा सुटण्याच्या वेळेस बसस्थानक, शाळा परिसर व मुख्य रस्त्यांवर रोड रोमियो घिरट्या घालत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत.

या प्रकारांमुळे अनेक पालक आपल्या मुलींच्या सुरक्षिततेबाबत तीव्र चिंता व्यक्त करीत आहेत.
काही मुली भीतीपोटी अशा घटना आई-वडिलांना किंवा शिक्षकांनाही सांगत नाहीत.
कारण, यामुळे आपले शिक्षण बंद होईल, अशी भीती त्यांच्या मनात असते.
याच मानसिकतेचा फायदा घेत रोड रोमियो हे प्रकार करत असल्याचे दिसून येत आहे.

या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सौ. अनिता ताई अंकुश जाधव यांनी
भोकरदन शहरात तातडीने दामीनी पथकाची स्थापना करावी,
बसस्थानक व शाळा परिसरात पोलीस पेट्रोलिंग वाढवावी
आणि मुलींची छेड काढणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

भोकरदन पोलिसांनी या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष देऊन
मुलींना सुरक्षित वातावरणात शिक्षण घेता येईल यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा पालक आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


📢 तुमच्या परिसरातील बातमी आमच्यापर्यंत पोहोचवा

सामाजिक, शैक्षणिक, गुन्हेगारी किंवा राजकीय बातमी असल्यास
Kattanews.in शी संपर्क साधा.
आपली बातमी आम्ही जबाबदारीने प्रकाशित करू.


🔗 Related News

 

संजीव पाटील

संजीव पाटील हे २० वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असलेले पत्रकार असून महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, प्रशासकीय व सार्वजनिक घडामोडींचे राज्यभरातून वार्तांकन करतात. नागरिकांचे प्रश्न आणि प्रशासनाशी संबंधित घडामोडी तथ्याधारित व विश्वासार्ह पद्धतीने मांडणे ही त्यांची ओळख आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment