हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

रातोरात शेतकऱ्यांचा कणा मोडला! येवती-रिठद शेतशिवारात ३०० पेक्षा जास्त स्प्रिंकलर तोट्यांची मोठी चोरी

Follow Us:
रिठद शिवारात स्प्रिंकलर तोट्यांची चोरी झाल्याने संतप्त शेतकरी

रिसोड | २२ जानेवारी २०२६

येवती-रिठद शेतशिवारातील स्प्रिंकलर चोरी प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. दि. २० जानेवारी २०२६ च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून ३०० पेक्षा जास्त स्प्रिंकलरच्या तोट्या लंपास केल्याची घटना समोर आली असून सकाळी ही बाब उघडकीस आली.

या घटनेमुळे येवती व रिठद येथील २५ हून अधिक शेतकरी थेट आर्थिक संकटात सापडले आहेत. याआधीही दापोरी, बेलखेडा, हिवरा पेन आदी परिसरात अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या असून त्यांचा तपास अद्याप लागलेला नाही.

प्रत्येक स्प्रिंकलर तोटीची किंमत ७०० ते ८०० रुपये असून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही चोरी म्हणजे दुहेरी मार ठरला आहे.

हे प्रकरण वाशिम पोलीस स्टेशन हद्दीत येत असताना, वृत्त लिहीपर्यंत पोलिसांची कोणतीही टीम घटनास्थळी पोहोचलेली नव्हती. मात्र, या घटनेची माहिती स्थानिक आमदार अमित सुभाषराव झनक यांना देण्यात आली आहे.

हे पण वाचा..

अखेर “कट्टा न्यूज” चा दणका: शेतकरी नेत्यांच्या एकजुटीमुळे प्रशासन झुकले, तालुका कृषी अधिकारी कांबळे तात्काळ निलंबित

आमदार झनक यांनी पोलिस ठाणेदारांना तात्काळ सूचना दिल्याचे सांगण्यात आले असून लवकरच घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला जाईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

🔍 चोरीने बाधित शेतकरी

येवती: मधुकर माळेकर, शुभम माळेकर, भगवान माळेकर, मोहन माळेकर, ज्ञानबा माळेकर, नारायण माळेकर, सुनील माळेकर.
रिठद: रामेश्वर आरु, विश्वनाथ आरु, विजय बोरकर, चंद्रकांत बोरकर, सदाशिव आरु, काशिनाथ आरु, पांडुरंग पाटील, प्रल्हाद आरु यांच्यासह अनेक शेतकरी.


📢 शेतकऱ्यांची मागणी

तात्काळ तपास करून चोरट्यांना अटक करावी व शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

👉 KattaNews Impact

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवणे हेच कट्टा न्यूजचे ध्येय आहे.

🔗 Related News

 

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

हर घर तिरंगा अभियानासाठी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

‘हर घर तिरंगा’ अभियानासाठी बुलढाणा जिल्हा सज्ज; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे मोठे आवाहन

साखरखेर्डा येथे सुसज्ज बसस्थानक उभारण्याची मागणी

७५ गावांच्या प्रवाशांचा प्रश्न कधी सुटणार? साखरखेर्ड्यात सुसज्ज बसस्थानकासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे साकडे

ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते अभिनेत्री व पत्रकार किरण वाघ यांना साई प्रेरणा गौरव पुरस्कार प्रदान करताना

शिर्डीत किरण वाघ यांचा दुहेरी गौरव! ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते ‘साई प्रेरणा गौरव पुरस्कार’

लोणार नगरपरिषदेत घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात निवेदन देताना डॉ. गोपालसिंह बछिरे व शिवसेना उ.बा.ठा. पदाधिकारी

घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात शिवसेना उ.बा.ठा. आक्रमक; 15 दिवसांत माहिती न दिल्यास लोणार नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा

उत्रादा ग्रामपंचायत कार्यालयाला महिलांचा घेराव; अर्धवट रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

उत्रादा ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा; ग्रामपंचायत कार्यालयाला महिलांचा घेराव, अर्धवट रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

एअरबॅगमुळे 75 वर्षीय वकिलाचा जीव वाचला; मेहकर येथे आयशरच्या धडकेत कारचा चक्काचूर

मेहकरमधील ज्येष्ठ वकिलाच्या कारला भरधाव आयशरची समोरून धडक; भीषण अपघातात कारचा चक्काचूर

Leave a Comment