हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

भोकरदन तालुक्यात धक्कादायक वास्तव! पती-पत्नी चालवत असलेला कुंटणखाना पोलिसांच्या छाप्यात उघड

On: January 13, 2026 6:15 PM
Follow Us:
राजुर येथे अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी हसनाबाद पोलिसांचा छापा

भोकरदन (जालना) १३ जानेवारी २०२६

भोकरदन तालुक्यातील राजुर येथे अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजुर बसस्थानक परिसरात राहणारे पती-पत्नी बाहेरून महिला आणून कुंटणखाना चालवत असल्याची गुप्त माहिती हसनाबाद पोलिसांना मिळताच त्यांनी छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत पती-पत्नीला अटक करण्यात आली असून अवैध वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजुर येथील रहिवासी गणपत सेठी व गीतांजली सेठी हे पती-पत्नी आपल्या राहत्या घरात बाहेरून महिला आणून त्यांच्याकडून अवैध वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती हसनाबाद पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी ग्राहक पाठवून खात्री करून छापा टाकला.

छाप्यादरम्यान पोलिसांनी ५,४०० रुपये रोख, दोन मोबाईल फोन व सुमारे ६०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. एकूण ६५,४०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

ही कारवाई हसनाबाद पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी संजय अहिरे, महिला पोलीस उपनिरीक्षक सौ. अर्चना भोसले, पोलीस अंमलदार नरहरी खार्डे, रामेश्वर सिन्नकर, दीपक सोनुने, नारायण चरावडे, प्रकाश बोर्डे यांच्या पथकाने केली.

ही कारवाई भोकरदन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, जालना जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सलअतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

हे पण वाचा..

जालना शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे आश्वासन

या प्रकरणी गणपत सेठी व गीतांजली सेठी या पती-पत्नीविरोधात अवैध कुंटणखाना चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पुढील तपास हसनाबाद पोलीस करत आहेत.


🟢 नागरिकांसाठी आवाहन

आपल्या परिसरात अशा प्रकारचा कोणताही बेकायदेशीर प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.


👉 हे पण वाचा..


📢 CTA

अशाच ताज्या, विश्वासार्ह व ग्रामीण भागातील बातम्यांसाठी KattaNews.in ला रोज भेट द्या आणि आम्हाला Follow करा.

संजीव पाटील

संजीव पाटील हे २० वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असलेले पत्रकार असून महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, प्रशासकीय व सार्वजनिक घडामोडींचे राज्यभरातून वार्तांकन करतात. नागरिकांचे प्रश्न आणि प्रशासनाशी संबंधित घडामोडी तथ्याधारित व विश्वासार्ह पद्धतीने मांडणे ही त्यांची ओळख आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment