हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मोठी राजकीय घडामोड! मेहकर नगरपरिषद उपाध्यक्षपद काँग्रेसकडे जाण्याची दाट शक्यता

On: January 13, 2026 9:56 AM
Follow Us:
मेहकर नगरपरिषद उपाध्यक्षपद निवडणुकीतील राजकीय घडामोड

मेहकर |१३ जानेवारी २०२६

मेहकर नगरपरिषद उपाध्यक्षपद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असून काँग्रेसकडे उपाध्यक्षपद जाण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. मेहकर नगरपरिषदेत काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्याने संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसची बाजू भक्कम मानली जात आहे.

नगरपरिषदेत स्वीकृत सदस्य म्हणून काँग्रेसचे कासम गवळी, शिंदेसेनेचे अजय उमाळकर आणि उद्धवसेनेचे अमर घोडे यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. मात्र काँग्रेसचे नवाज कासम गवळी आणि विजय वायाळ यांचे अर्ज आवश्यक अर्हता पूर्ण न केल्यामुळे अवैध ठरविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मंगळवारी मेहकर नगरपरिषद उपाध्यक्षपदाची निवड होणार असून, सध्याच्या राजकीय गणितानुसार हे पद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता प्रबळ मानली जात आहे. माजी नगराध्यक्ष व काँग्रेस नेते कासम गवळी हे नगरपरिषदेचे गटनेते मो. अलीम मो. ताहेर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतील, अशी जोरदार चर्चा आहे. तसेच मुजीब कुरेशी यांचे नावही चर्चेत आहे.संख्याबळाच्या दृष्टीने काँग्रेस, शिंदेसेना आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांना प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मागील पराभूत उमेदवारांची ‘एन्ट्री’

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष कासम गवळी हे स्वतः स्वीकृत सदस्य म्हणून नगरपरिषदेत प्रवेश करणार आहेत. तर शिंदेसेनेकडून अजय उमाळकर यांची स्वीकृत सदस्य म्हणून वर्णी लागणार आहे.

हे पण वाचा..

अतिवृष्टी, कर्जाचा डोंगर आणि विवंचना; शिंदी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

उद्धव ठाकरे शिवसेनेकडून नगराध्यक्ष किशोर गारोळे यांचे विश्वासू सहकारी अॅड. आकाश घोडे यांचे बंधू अमर घोडे यांचे नाव स्वीकृत सदस्यपदासाठी आघाडीवर आहे.

👉 अशाच राजकीय घडामोडींसाठी KattaNews.in वाचत राहा

बुलढाणा जिल्हा, मेहकर आणि महाराष्ट्रातील ताज्या राजकीय बातम्या सर्वात आधी.

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

साखरखेर्डा येथे अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान करताना भाजपचे मान्यवर

साखरखेर्ड्यात अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा सन्मान; पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा उपक्रम

श्वेता महाले संजय गायकवाड वाद बुलढाणा राजकारण

श्वेता महाले-संजय गायकवाड वाद पुन्हा पेटला, इंस्टाग्राम व्हिडिओतून थेट चिमटा ‘रावण बनकर आओगे तो…’

शिवदास रिंढे बुलढाणा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस फेरनिवड

शिवदास रिंढे यांची बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी फेरनिवड

श्वेता महाले संजय गायकवाड वाद बुलढाणा भाजप शिवसेना

‘लहान मुलगा इकडे, बायको तिकडे, मोठा मुलगा तिकडे…’ ‘तुम्ही शिवसेना वाढवताय की स्वतःचा परिवार?’ श्वेता महालेंचा संजय गायकवाडांवर थेट निशाणा

संजय गायकवाड विनयभंग गुन्हा बुलढाणा

संजय गायकवाड विनयभंग गुन्हा: बुलढाण्यात शिवसेना आमदारावर FIR दाखल, नवा वाद चिघळला

Leave a Comment