किशन काळे,रिसोड प्रतिनिधी
वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुका कारंजा मध्ये ऐन दिवाळी तोंडावर आल्यामुळे सोयाबीनचे भाव कमी झाल्यामुळे बाजारामध्ये सोयाबीन आवक वाढलेली आहे त्यातच मार्केटमध्ये कमी भाव घेऊन कास्तकार लोकांचे अतोनात नुकसान होत आहे. शेतकरी आपल्या सोयाबीनचा भाव मिळावा याकरिता मार्केटमध्ये आपली सोयाबीन घेऊन विकायला जात आहे पण मार्केटमध्ये गेल्यानंतर अतिशय कमी दरात सोयाबीन ची खरेदी केली जात आहे .कारंजा मार्केट कमिटी कमिटी मध्ये सोयाबीन विकायला गेली असता 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता मार्केट कमिटीने २५०० ते ४००० रुपये भाव देऊन शेतकऱ्यांनी लावलेला खर्च सुद्धा निघून असा झाला आहे.
तर त्या ठिकाणी कारंजा तालुक्यामध्ये पूर्ण शेतकरी संताप झाले आणि वाशिम जिल्ह्यातील कारंजा मध्ये सोयाबीनचा लिलाव बंद पाडण्यात आला. त्यानंतर रास्ता रोको करण्यात आला घटनास्थळी तहसीलदार उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा शहर आणि पोलीस ग्रामीण कारंजा ग्रामीण आणि शेअर पोलीस ठाणेदार पोलीस स्टेशनचे कर्मचारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते शेतकरी संतप्त झाल्यामुळे पोलिसांना लाठी चार्ज देखील करावा लागला यामध्ये काही शेतकरी जखमी झालेले आहेत.वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुका शेतकऱ्याचे असे म्हणणे आहे.
गेल्या 15 ऑक्टोबर पासून हमीभावापेक्षा कमी बाजार मिळत असल्याने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य शासनाकडे पत्र लिहून तक्रार केली होती परंतु यांची कुठल्याही प्रकारची दखल राज्य शासनाने घेतली नाही त्यामुळे त्या ठिकाणी पोलिसांनी शेतकऱ्यावर लाठी चार्ज केलेला आहे काही शेतकरी सुद्धा जखमी झालेले आहेत यानंतर शासनाने पाठपुरावा करून शेतकऱ्याला हमीभाव देण्यात यावा असे कारंजा तालुक्यातील शेतकऱ्याचे मनातले आहे.