पोलीस स्टेशन शिरपूर चे सिंघम पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार.

 

 

 

 

 

 

 

प्रतिनिधी /किशन काळे रिसोड

 

वाशिम (washim) जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते मालेगाव तालुक्यातील शिरपूर (shirpur police station) पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांचा त्यांनी महत्त्वाची कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला आंतरराज्यातील दरोड्यातील मुख्य आरोपीला घटनेच्या सखोल अभ्यास करून आधुनिक पद्धतीने व गोपनीय माहितीच्या आधारे टीम पाठवून आरोपी पळून जाण्याच्या मार्गावर तयारीत असताना बुलढाणा जिल्ह्यामधून सिनेस्टाईल पद्धतीने दरोडेखोरांना जेरबंद केल्या गेले.

 

 

वाशिम जिल्ह्यामध्ये विशेष कामगिरी करून खाकीची चमक दाखवून या तार्‍यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक अनुसतारे यांनी सन्मान केला आहे अनसिंग पोलीस स्टेशन हद्दीतील देगाव येथे टाकलेल्या दरोड्या दरोड्या मध्ये फरार असलेला आरोपी लातूर जिल्ह्यात 15 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या खुनासह पाहिजे असलेला मुख्य आरोपीला ग्राम बरटाळा जिल्हा बुलढाणा येथून गोपीने माहितीच्या आधारे तांत्रिक पद्धतीने तपास करून आरोपीला पूर्वी शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेतले या घटनेतील मुख्य आरोपीला लातूर मधील पोलिसांची पदके महाराष्ट्र मध्ये आरोपीचा शोध घेत होते परंतु सदर आरोपीस मोठ्या सिताफिने शिरपूर पोलिसांनी जेर बंद केले.

 

 

वाशिम जिल्ह्यातील पोलीस अनसिंग हद्दीतील ग्राम देगाव च्या शिवारात दरोडा टाकणारी टोळी दिनांक पाच ऑगस्ट 24 ते 6 ऑगस्ट मध्ये रात्री घरामध्ये शिरूर सोन्या चांदीचे दागिने नेण्याच्या उद्देशाने घरात घुसून त्यांनी त्या घरामधला एक लाख 74 हजाराचा येवज लुटून लुटून नेला होता याप्रकरणी पुढील तपास करून आरोपीस अटक जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण शिरपूर यांच्याकडे सोपविल्या गेली होती शिरपूर पोलीस ची टीम बुलढाणा जिल्ह्यामध्ये ठिकाणी पाठवून मोठ्या पद्धतीने सिने स्टाईल पद्धतीने पकडून विशेष चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांची दखल घेऊन पोलीस अधीक्षक अनुज तारे पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ताले पोलीस. समीर पठाण शरद कांबळे यांचा परशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.