किशन काळे/रिसोड प्रतिनिधी
वाशिम (washim) जिल्ह्यातील रिसोड (risod) तालुक्यातील बिबखेडा मधील घटना बस स्थानक ठिकाणी एक युवक तलवार घेऊन फिरत असताना रिसोड पोलिसांनी युवकाजळील तलवार जप्त करून कारवाई करण्यात आली. 15 ऑक्टोंबर रात्री बारा वाजता दरम्यान पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले असून सचिन किसन नरवाडे वय वर्ष 24 राहणार बिबखेडा तलवार घेऊन फिरणारे युवकांचे नाव आहे. त्यावर रिसोड पोलिसांनी कलम 4 . 25 शस्त्र अधिनियम 1959 नुसार कारवाई करत त्यावर आगामी निवडणुका संदर्भात प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.
याबाबत पोलीस सूत्रातून मिळालेल्या माहिती नुसार पोलिसांना माहिती मिळाली की सचिन किसन नरवाडे हा युवक बिबखेडा येथील बस स्थानकामध्ये तलवार घेऊन फिरत असताना दिसला.व हा युवक दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने फिरत होता. यावर जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे पोलीस उप विभागीय अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार भूषण गावंडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सय्यद हरून रतन बावस्कर निलेश तायडे सुनील इंगळे चालक इंगळे यांनी घटनास्थळ गाठून सदर युवकाकडून तलवार जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक वसंत तहकीक करीत आहेत.