नारायणराव आरू पाटील, वाशिम/प्रतिनिधी
रिसोड तालुक्यातील रिठद येथील जिल्हा जिल्हा परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळा क्रमांक एक येथे आयोजित केली. ग्रामसभा दिनांक ३१/९/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता अनेक विषयावर सभा आयोजित केली होती .यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना,२०२५-२६ समृद्ध बजेट आराखडा तयार करणे, कर वसुली शंभर टक्के करणे, रमाई आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती संवर्गातील (S.C.)पात्र कुटुंबाची प्रतीक्षा यादी करणे शबरी आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती संवर्गातील (S.C.)पात्र कुटुंबाची प्रतीक्षा यादी तयार करणे,
मुख्यमंत्री वयोश्री योजना अंमलबजावणी लाभ देणे बाबत, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अंमलबजावणीचा लाभ देणे बाबत, अतिरिक्त ग्राम रोजगार सेवक निवड करणे बाबत, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत सहभाग नोंदणी बाबत, पाणी फाउंडेशन वॉटर कप बाबत स्पर्धा, जलमित्र, चीया लागवड, इत्यादी ग्रामपंचायत मार्फत विषय घेण्यात आले. या अगोदर ग्रामपंचायत ने केलेली कामे, त्यावर आलेला निधी खर्च किती झाला ?,शिल्लक किती राहिला?, याबाबत ग्राम विकास अधिकारी भुसारी यांनी माहिती दिली.
ही सभा सरपंच सौ.चित्राबाई अंभोरे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते. गावातील अनेक मान्यवरांच्या आणि नागरिक व महिलांच्या उपस्थितीने ही सभा घेण्यात आली. महिलांनी सुद्धा स्वच्छतेबाबत प्रश्न मांडले. स्वच्छतेचे प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामविकास अधिकारी यांनी १०दिवसाचा वेळ मागितला.याबाबतचे मार्गदर्शन व माहिती, ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी भुसारी यांनी सर्व नागरिकांना दिली.
यावेळी बंदोबस्तासाठी वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल गौरव भोम्बे, पोलीस कॉन्स्टेबल अखंड हे यावेळी उपस्थित होते व ग्राम सभेदरम्यान कोणताही गोंधळ झाला नाही हे ग्रामसभा शांततेत पार पडली.